🕒 1 min read
बंगळूरू: इंडियन प्रीमियर लीगच्या मेगा लिलावात भारतीय फलंदाज देवदत्त पडिक्कलला राजस्थान रॉयल्सने ७. ७५ कोटींमध्ये विकत घेतले (Devdutt Padikkal to Rajasthan Royals 7. Bought for Rs 75 crore) आहे. याआधी तो रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळला होता.
देवदत्त पडिक्कल हा आयपीएल २०२१ मध्ये आरसीबीसाठी उत्कृष्ट कामगिरी करणारा खेळाडू ठरला होता. त्याने १४ सामन्यांत ४११ धावा केल्या होत्या. यामध्ये एक शतक आणि एक अर्धशतक याचा समावेश आहे. त्याने २९ आयपीएल सामन्यांमध्ये ३१.५७ च्या सरासरीने८८४ धावा केल्या आहेत.
दरम्यान राजस्थान रॉयल्सने फक्त तीन क्रिकेटपटूंना रिटेन केले. पडिक्कल व्यतिरिक्त, रॉयल्सने ट्रेंट बोल्टला ८ कोटीत तसेच वेस्ट इंडिजचा स्टार शिमरॉन हेटमायरला ८.५ कोटीत आणि अनुभवी भारतीय फिरकीपटू आर अश्विनलाही ५ कोटीमध्ये विकत घेतले आहे. दरम्यान पहिल्यांदा २०१५ साली ट्रेंट बोल्टला सनरायझर्स हैदराबादने ३.८ कोटी रुपयांना विकत घेतले होते. मागील वर्षी तसेच २०२० आणि २०२१ मध्ये तो मुंबई इंडियन्सचा भाग होता. मात्र यावर्षी त्याला राजस्थान रॉयल्स संघाने ८ कोटींत खरेदी केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “आम्ही एकदाही घोड्यावर…”; खासदाराचे १८ वर्षाच्या मुलीसोबत तिसऱ्यांदा लग्न, सिंगल लोक हैराण
- अजित पवार यांनी सांगितली कोरोना काळातली आठवण; म्हणाले…
- IPL Auction 2022 : इंग्लंडचा ‘रॉय’ बनला गुजरातचा ‘टायटन’
- IPL Auction 2022 : सुरेश रैना पहिल्या फेरीत अनसोल्ड!
- प्रशांत किशोर आणि तृणमूल काँग्रेस मधील वाद चिघळला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
