🕒 1 min read
पुणे : पुण्यामध्ये जैव सुरक्षा स्तर २ आणि ३ नविन प्रयोगशाळेच्या बांधकामाचे भूमिपूजन आणि कुक्कुट व विषाणू लस निर्मिती प्रयोगशाळा नवीन इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्या हस्ते करण्यात आले. तद्पश्चात अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी नागरी आणि ग्रामीण संस्कृतीमध्ये माणूस आणि प्राण्याचे जीवाभावाचे नाते आहे, असे पवार म्हणाले.
यावेळी बोलत असतांना अजित पवार म्हणाले की,‘कृषीसंस्कृतीमध्ये पशुपालनाचे मोठे महत्त्व असून नागरी आणि ग्रामीण संस्कृतीमध्ये माणूस आणि प्राण्याचे जीवाभावाचे नाते आहे. देवदेवतांच्या प्रतिमांसोबतही प्राणी बघायला मिळतात. फक्त इतकेच नाही तर आयुष्याच्या शेवटच्या प्रवासाला जेव्हा यमदेव घेऊन जातो तेव्हा त्यांच्या जवळदेखील रेडा दाखवलेला आहे’, असे पवार म्हणाले.
दरम्यान, यावेळी अजित पवार यांच्यसह पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, तसेच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे देखील उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या:
- IPL Auction 2022 : सुरेश रैना पहिल्या फेरीत अनसोल्ड!
- IPL Auction 2022 : इंग्लंडचा ‘रॉय’ बनला गुजरातचा ‘टायटन’
- अजित पवार यांनी सांगितली कोरोना काळातली आठवण; म्हणाले…
- “आम्ही एकदाही घोड्यावर…”; खासदाराचे १८ वर्षाच्या मुलीसोबत तिसऱ्यांदा लग्न, सिंगल लोक हैराण
- प्रशांत किशोर आणि तृणमूल काँग्रेस मधील वाद चिघळला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
