पुणे : मार्च महिन्यापासून पुण्यासह राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने पुन्हा एकदा स्थिती बिकट झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर, प्लाज्मा आदींचा तुटवडा भासत असल्याने अनेकांना जीव गमवावा लागत आहे.
पुणे जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णसंख्या असून ऍक्टिव्ह रुग्णांची संख्यांही वाढली आहे. यामुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. दुसऱ्या बाजूला मुंबईतील रुग्णसंख्या काहीशी कमी होत असताना उच्च न्यायालयाने पुण्यातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्येवर आश्चर्य व्यक्त केलं आहे. पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असेल तर पुण्यात पूर्णपणे लॉकडाउन करा, अशा सूचना देखील न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे.
न्यायालयाच्या या सूचनेनंतर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी देखील यावर भाष्य केलं आहे. ‘न्यायालयासमोर पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे ग्रामीण जिल्हा असा एकत्र आकडा सादर करण्यात आला आहे. मात्र, पुणे शहराची रुग्णसंख्या सध्या नियंत्रणात आहे. त्यामुळे अजून कडक लॉकडाऊनची गरज नसून सध्याच्या लॉकडाऊनचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत,’ असं मोहोळ यांनी स्पष्ट केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘संजय काकडेंवर आता तुरुंगात जायची वेळ आलीये’, ‘त्या’ वक्तव्यावर नवाब मलिक संतापले
- गरज पडल्यास मराठा आरक्षणासाठी एकदिवसीय अधिवेशन बोलावणार; अजितदादा सरसावले
- अग्नितांडव सुरूच : नितीन देसाई यांच्या स्टुडिओला लागली आग, जोधा अकबर सेट जळून खाक
- ‘मराठा आरक्षणासाठी वेळप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात पंतप्रधानांची भेट घेवू’
- ‘कोरोना लसीकरणाची गती कमी होऊ देऊ नका’, पंतप्रधान मोदींचे राज्यांना आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

