🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : बकरी ईदच्या कुर्बानी बाबत उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण आदेश दिला आहे. बकरी ईदच्या निमित्ताने कुर्बानी दिली जाते. ही कुर्बानी फ्लॅट आणि सोसायटी परिसरात कुर्बानी देण्यास उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. प्राणीमित्रांकडून बकरी ईदसाठी कत्तलखान्याबाहेर तसंच खासगी जागांसाठी देण्यात आलेल्या परवान्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल कऱण्यात आली होती. यावेळी उच्च न्यायालयाने बकरी ईदनिमित्त फ्लॅटमध्ये कुर्बानी देण्यास मनाई केली आहे.
यामुळे मुंबई पालिकेकडे आलेले सुमारे ८ हजार परवाने रद्द होणार आहेत. उच्च न्यायालयाने मनाई करताना समुदायिक केंद्रात कुर्बानीची सोय असलेल्या ठिकाणी एक किलोमीटरच्या परिसरात कोणत्याही गृहनिर्माण सोसायटीला स्वतंत्र परवानगी देऊ नका असं आपल्या आदेशात म्हटलं आहे.
बकरी ईदसाठी पालिकेने ऑनलाइन जाहिरात दिली होती. या जाहिरातीमधून तात्पुपत्या काळासाठी बकरे कटाईचे परवाना देण्याचं सूचित करण्यात आलं होतं. मात्र काही प्राणीमित्र संघटनांनी उच्च न्यायालयात धाव घेत जनहित याचिका दाखल करत या निर्णयाला आव्हान दिलं होतं.
महत्वाच्या बातम्या
हिंदुंमध्ये पवित्र मानल्या जाणा-या गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करा – इल्यासी
लोकसभेला कॉंग्रेसमध्ये, तर विधानसभेसाठी संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांचे ‘राष्ट्रवादी पुन्हा’
विखे पाटील, क्षीरसागरांचे काम सुरूच राहणार : फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
