🕒 1 min read
औरंगाबाद : वाळू भरुन आणण्यासाठी दिलेला ट्रक व पैसे घेवून पसार झालेल्या ट्रक चालकाला हर्सुल पोलिसांनी शुक्रवारी दि.२१ सायंकाळी अटक केली. अनिल रामसिंग जोनवाल (३२, रा. खांडील पिंपळगाव ता. खुलताबाद) असे आरोपीचे नाव असून त्याला सोमवारपर्यंत दि.२४ पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी रुहिना अंजूम यांनी शनिवारी दि.२२ दिले.
हर्सुल परिसरातील अंबीका नगरात राहणारे सुभाष सुखदेव बांबुर्डे (३८) यांनी फिर्याद दिली. त्यानूसार, बांबुर्डे हे ट्रक (क्रं. एमएच-४४-यू-७१३१) मालक असून ट्रकवर आरोपी अनिल जोनवाल हा चालक म्हणून काम करित होता. ५ फेब्रुवारी रोजी बांबुर्डे यांनी वाळू भरून नंदुरबार येथे जाण्यासाठी व डिझेल भरण्यासाठी जोनवाल याला ३५ हजार रुपये दिले होते. बांबुर्डे यांनी दुसर्या दिवशी जोनवाल याला फोन केला असता, त्याने घरी येत असल्याचे सांगीतले, व ट्राफिक असल्याचे सांगुन फोन कट केला. त्यानंतर बांबुर्डे यांनी आरोपीला फोन केला असता, आरोपी उडवा उडवीची उत्तरे देत फोन बंद करुन टाकत होता. आरोपीने ट्रक पळविल्याचे लक्षात आल्यानंतर हर्सुल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात आले असता, सहायक सरकारी वकील मनिषा गंडले यांनी आरोपी हा सवईचा गुन्हेगार असून त्याच्याकडून गुन्ह्यातील ट्रक आणि रोख रक्कम जप्त करणे आहे. आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत काय याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.
महत्त्वाच्या बातम्या
- दहावीच्या परीक्षा रद्द करण्यावरून उच्च न्यायालयाने फटकारलं; मुख्यमंत्री म्हणाले…
- भाषणबाजी नको, म्युकरमायकोसिस विरोधात काय होमवर्क केला ते सांगा ; कॉंग्रेसचा सवाल
- ‘आजच्या 3 तासाच्या वादळाने तर कोकणाची पार धूळधाण केली, किंबहुना…’
- भारतात कोरोनाचा हाहाकार ; ‘या’ राज्याने वाढवला ७ जूनपर्यंत लॉकडाऊन
- ‘आजच्या 3 तासाच्या वादळाने तर कोकणाची पार धूळधाण केली, किंबहुना…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

