मुंबई : ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’ हा कार्यक्रम थोड्याच काळात प्रेक्षकांचा आवडता कार्यक्रम ठरला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून आलेली नृत्यातली प्रतिभा प्रेक्षकांना या मंचावर पाहायला मिळतीय. याच मंचावर आता येत्या आठवड्यात २१ आणि २२ डिसेंबरला ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’मध्ये अभिनेता गोविंदा उपस्थित असणार आहे.
गोविंदाच्या येण्यानी स्पर्धकांमध्ये उत्साह वाढला आहे. या आठवड्यात होणारी सगळी सादरीकरणं गोविंदाला समर्पित असणार आहेत. गोविंदासाठी खास ट्रिब्यूटही सर्व स्पर्धक आणि त्यांचे गुरू यांनी सादर केलेले पाहायला मिळणार आहे.
धर्मेश देखील स्वतः गोविंदाचा चाहता असल्याने गोविंदाच्या उपस्थित धर्मेश भारावून गेला होता. या कार्यक्रमातला हा बाद फेरीचा पहिलाच आठवडा आहे. या भागात टॉप १२ पैकी कोणता एक स्पर्धक बाद होणार, हे कळणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- विद्यार्थ्यांसाठी खुशखबर : एक-दोन नव्हे तब्बल चार वेळा होणार JEE Main परीक्षा
- ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार साडेतीन हजार कोटी रुपयांचं अर्थसहाय्य
- अतिवृष्टीच्या संकटातून सावरण्यासाठी राज्यात शेतकऱ्यांना दिवसा विज पुरवठा करा : भाजपा
- पहिल्या टेस्ट मॅचमध्ये पृथ्वी शॉ पुन्हा अपयशी, एकही रन न घेता माघारी
- भारताकडे कोहली-रोहित शिवाय सामना जिंकवून देतील असे फलंदाज आहेत : तेंडुलकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

