मुंबई – महाविकास आघाडी सरकारने १५ मोठ्या कंपन्यांसोबत केलेला कराराने औद्योगिक क्षेत्राला भरारी मिळणार असून या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेस स्वागत करत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली.
लॉकडाऊनच्या वेळी सरकारने सुमारे २१ कंपन्यांशी करार केला आहे. त्यापैकी १५ कंपन्यांशी आज करार झाला असून महाराष्ट्रात एकूण ५१ हजार कोटींची गुंतवणूक येणार आहे. तर उर्वरित जानेवारीपर्यंत डझनभर कंपन्यांबरोबर सामंजस्य करार होण्याची शक्यता आहे. राज्यात १.५० लाख कोटींची गुंतवणूक आणण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे असेही महेश तपासे यांनी सांगितले.
२ कोटी नोकर्या देण्याचे आश्वासन देणारे भाजपचे मागील सरकार राहिले बाजुला परंतु महाविकास आघाडी सरकारने दिलेला शब्द पाळला आहे असेही महेश तपासे म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारने राज्यात ३५ हजार कोटींच्या गुंतवणुकीचा करार केला असून, या गुंतवणुकीमुळे सुमारे २४ हजार लोकांना रोजगार मिळणार अशी सरकारला अपेक्षा असून या अपेक्षेला सरकार नक्की उतरेल असा विश्वास महेश तपासे यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- पायाभूत सुविधांसाठी निधीची अजिबात कमतरता पडू देणार नाही : यशोमती ठाकूर
- करोडो हिंदूंच्या भावना दुखावल्यामुळे सोनी टी.व्ही.आणि अमिताभ बच्चन येणार गोत्यात ?
- मेट्रो कारशेडचं काम थांबवा; मोदी सरकारच्या आदेशामुळे प्रकल्प लटकण्याची चिन्हे
- प्राजक्ताच्या अचानक एक्झिट नंतर ‘ही’ अभिनेत्री साकारणार आर्या ची भूमिका
- मुख्यमंत्री बदलल्यानंतर जागेची मालकी बदलते का? महापौरांचा भाजपला थेट सवाल

