Share

घटस्फोटानंतर २०० कोटी रुपयांची पोटगी धुडकावणाऱ्या अभिनेत्रीची का होतेय एवढी चर्चा?

Published On: 

मुंबई : लग्नबंधनात अडकताना साता जन्मांची साथ निभावण्याची वचनं एकमेकांना दिली जातात. काहींना जोडीदाराची अशी साथ मिळते, तर काहीजणांच्या नशिबबात मात्र वेगळीच वळणं लिहिलेली असतात. मग इथे तुमची श्रीमंती, प्रसिद्धी सारंकाही फिकं पडतं. जगण्यात इतकी हतबलता येते की त्यातून सावरावं कसं हाच प्रश्न उभा राहतो.

अभिनेत्री समंथा हिला घटस्फोटाची झळ सोसावी लागली. पतीपासून वेगळं होणं अर्थात तिच्यासाठी कठीण होतं, पण या लढाईत तिनं स्वबळावर स्वत:ला सावरण्याचा निर्णय घेतला. आता यातून ती बाहेरही पडताना दिसत आहे. पण, कमालीची लोकप्रियता असल्यामुळं भूतकाळ काही तिची पाठ सोडताना दिसत नाही. ही अभिनेत्री आहे समंथा रुथ प्रभू.

दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन यांचा मुलगा नागा चैतन्य याच्याशी समंथाचं लग्न झालं होतं. त्यानंतर जे काही घडलं ते आता सर्वज्ञात आहे. असं म्हणतात की समंथानं 200 कोटी रुपयांची पोटगीही नाकारली होती. हीच समंथा आता मोठ्या आत्मविश्वासानं पुन्हा एकदा कलाजगतामध्ये वावरु लागली आहे. नुकताच तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये ती एका पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर आली

https://www.instagram.com/reel/Ca7Z86ZKvCH/?utm_medium=copy_link

हिरव्या रंगाचा शिमरी टेल गाऊन, मेसी टेल लूक आणि मिनीमल मेकअप असा एकंदर तिचा लूक होता. यावेळी समंथा मोठ्या आत्मविश्वासाने रेड कार्पेटवर आली आणि तिच्यावरच सर्वांच्या नजरा खिळल्या. स्मितहास्याने समंथाने सर्वांच्या काळजाचा ठाव घेतला. तिचा हा नवा अंदाज सर्वांनाच इतका भावला की पाहता पाहता तिच्या या लूकचा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!