Share

यात्रांमध्ये लोकांची करमणूक करणारा कुणीतरी विदूषक लागतोच; टकलेंची दानवेंवर खोचक टीका

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानंतर काढण्यात आलेल्या महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री यांच्या समवेत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे सहभागी झालेत. अशा यात्रांमध्ये लोकांची करमणूक करणारा कुणी एक विदूषक लागतोच, अशी खिल्ली राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष आ. हेमंत टकले यांनी उडवली आहे.

रावसाहेब दानवे प्रदेशाध्यक्ष असताना विदुषकाची भूमिका निभावत होते. तीच भूमिका केंद्रिय मंत्री झाल्यानंतर देखील निभावत असल्याचे पाहून आम्ही धन्य झालो, असा टोला टकले यांनी लगावला आहे. राजकारणात विरोधी पक्षांसंदर्भात किती खालच्या स्तरावर जाऊन बोलावे याचे भान नसल्याने तसेच सत्तेमुळे अंगात आलेल्या मस्तीमुळे ते विरोधी पक्षांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये करत असल्याचे टकले म्हणाले.

एखाद्या पक्षाची यात्रा मतदारांच्या जागृतीसाठी निघते. मात्र, विरोधकांच्या यात्रेची प्रेतयात्रा म्हणून संभावना करणे, एखाद्या कार्यकर्त्यालासुद्धा अशोभनीय असताना इथे तर ज्यांच्या हाती सूत्रे आहेत तेच असे बरळत आहेत. त्यामुळे अशी बेताल वक्तव्ये आणि केलेली तुलना तर्काच्या विरोधात आहे. असे विदुषकी चाळे जगासमोर आल्याने केवळ यांची अपवित्र मानसिकताच समोर येते, असेही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!