Share

महाराष्ट्र कॉंग्रेसमधील ‘हा’ दिग्गज नेता करणार घरवापसी

Published On: 

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी काँग्रेसचे नेते माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे काँग्रेसने बुधवारी निलंबन रद्द केले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी हे निलंबन रद्द केले असल्याची माहिती काँग्रसेचे सरचिटणीस अॅड. गणेश पाटील यांनी दिली. यासाठी पाटील यांनी सतिश चतुर्वेदी यांना आपले निलंबन मागे घेण्यात येत असल्याचे पत्र पाठवले आहे. तसेच या निर्णयाची एक प्रत नागपूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनाही पाठवून देण्यात आली आहे.

फेब्रुवारी २०१८ मध्ये त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांचं निलंबन मागे घेण्यात आले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांच्या मुलानं अलिकडेच शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतरही चतुर्वेदी यांच्यावरील कारवाई रद्द करण्यात आली आहे.

‘काँग्रेसच्या बाहेर कधीही नव्हतो आणि राहणारही नाही. गेल्या पाच वर्षांपासून पक्षाचे काम अव्याहतपणे केले. त्यात कधीही खंड पडू दिला नाही. कुणावर नाराजी नाही वा कुणाबद्दल द्वेष नाही. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी व प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दाखवलेला विश्वास सार्थकी ठरवू अशी भावना चतुर्वेदी यांनी व्यक्त केली.

पक्षाने चतुर्वेदी यांना सहा वर्षांसाठी निलंबित का केले होते ?

अडीच वर्षांपूर्वी महापालिका निवडणुकीदरम्यान तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर शाईफेक प्रकरणात सतीश चतुर्वेदी यांच्यावर अप्रत्यक्ष आरोप करण्यात आले. तसेच, विविध प्रभागांत बंडखोरांचे पॅनल उभे करून त्यांचा प्रचार केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या घटनांवरून त्यांना निलंबित करण्यात यावे, यासाठी चतुर्वेदी-राऊत विरोधी गटाने बरेच प्रयत्न केले. अखेर, पक्षाने चतुर्वेदी यांना सहा वर्षांसाठी निलंबित केले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!