Share

आसामच्या मुख्यमंत्रिपदी हेमंत बिस्व सरमा, शपथग्रहण सोहळा संपन्न

Published On: 

गुवाहाटी : आसाममध्ये नुकत्याच झालेल्या विभानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने विजय मिळवला. या विजयानंतर सर्बानंद सोनोवाल की हिमंत बिस्वा सरमा मुख्यमंत्री होणार अशी चर्चा रंगली होती. अखेर या चर्चाना पूर्णविराम मिळाला असून हिमंत बिस्वा सरमा यांनी आसामचे १५ वे मुख्यमंत्री म्हणून शपथग्रहण केलीय. राज्यपाल जगदीश मुखी यांनी त्यांना आज मुख्यमंत्रीपदाची आणि गोपनियतेची शपथ दिली. कार्यक्रमाला भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा हे देखील सहभागी झाले होते.

विधानसभा निवडणुकीमध्ये बहुमत मिळवल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नावावरून भाजपमध्ये संभ्रम होता. सर्बानंद सोनोवाल हेच पुन्हा मुख्यमंत्री होणार की हिमंत बिस्वा सरमा यांच्या खांद्यावर आसामचा भार सोपवला जाणार यावर एकमत नव्हते. अखेर गेल्या शनिवारी पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी सरमा आणि सोनोवाल यांच्यासोबत गृहमंत्री अमित शहा व भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. यानंतर आज हिमंत बिस्वा सरमा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.

आसाममध्ये तीन टप्प्यात झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बहुमत मिळवले आणि ७५ जागा जिंकल्या. विशेष म्हणजे आसाममध्ये गेल्या ७० वर्षात एकाही पक्षाला सलग सत्ता मिळवता आली नव्हती. मात्र भाजपने पुन्हा सत्ता मिळवत इतिहास रचला.

त्यानंतर आज सोमवारी, मुख्यमंत्र्यांसोबत १३ मंत्र्यांचाही शपथविधी पार पडला. यात भाजपचे १०, एजीपीच्या दोन आणि यूपीपीएलच्या एका आमदाराचा समावेश आहे. मुख्यमंत्री सरमा यांच्यासोबत आसामचे भाजप प्रमुख रणजितकुमार दास, आसामगढ परिषद (एजीपी) प्रमुख अतुल बोरा, यूपीपीएलचे नेते यूजी ब्रह्मा, भाजप नेते रिमाल शुक्लवैद्य, भाजप नेते चंद्र मोहन यांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!