Share

लातूरच्या आरोग्यसेवेसाठी कॅलिफोर्नियातून मदत !

Published On: 

लातूर: सध्या लातूर जिल्ह्याची परिस्थिती कोरोनाने चांगलीच बिघडली आहे. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत तर दुसरी कडे वैद्यकीय सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत स्थानिक प्रशासनाची चांगलीच गोची होत असल्याचे चित्र सध्या लातूर मध्ये बघायला मिळत आहे. जिल्ह्यातली ही स्थिती पाहून सातासमुद्रापार कॅलिफोर्नियात राहणाऱ्या व्यंकटेश बिराजदार यांनी लातूर आरोग्यासाठी एक लाखाची मदत पाठवली. विदेशात राहून जन्मभूमीची ओढ काय असते याचे चांगले उदाहरण त्यांनी आपल्या समोर ठेवले आहे.

कोरोना महामारीच्या अभूतपूर्व संकटात लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे आणि महानगरपालिका झोकून देवून अहोरात्र काम करीत आहे, त्यांच्या कामास प्रेरित होवून मुळचे लातूरचे पण सध्या कॅलिफोर्नियामध्ये वास्तव्यास असलेले व्यंकटेश बिराजदार यांनी हे मदतीचे पाऊल उचलले आहे. बिराजदार यांनी पाठविलेल्या मदतीमधून मनपाच्या डेडीकेटेड कोविड केअर सेंटर करिता ऑक्सीजन कॉन्सनट्रेटर मशीन, बी.पी.ई अप्रांटिस, ग्युकोमीटर यासह आवश्यक औषधे खरेदी करण्यात आली. लातूरच्या या दातृत्ववान सुपूत्राचे लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी आभार मानले.

सोशल मिडियाच्या माध्यमातून बिराजदार आपल्याशी जोडलेले होते तसेच त्यांच्या मनात  जन्माभूमिसाठी असलेल्या ओढीमुळे बिराजदार यांनी आपल्याशी संपर्क साधत आरोग्य सुविधेसाठी मदतीची भावना व्यक्त केली. व्यंकटेश बिराजदार यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वामुळे मनपाच्या प्रयत्नांना अधिक बळ मिळाले असल्याचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!