नंदुरबार: हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या ३-४ तासांमध्ये अहमदनगर, बीड, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यातल्या काही भागांमध्ये अवकाळी पाऊस सुरू, त्यामुळे ज्यातला शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असताना पाहायला मिळत आहे. यामध्ये हरभरा, कांदा पिकांचे अधिक नुकसान झाले आहे. तसेच द्राक्ष बागांनाही मोठा फटका बसला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात बोपखेल आणि चरणमाळ घाटात प्रचंड गारपीट झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात बोपखेल आणि चरणमाळ घाटात प्रचंड गारपीट झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होतचं आहे. शेतकऱ्यांना स्वताची व पिकांची काळजी घेण्यास हवामान खात्याने सूचना दिलेल्या आहेत.
कोकणामध्ये आंबा – काजूचे नुकसान –
तळकोकणातही चांगली गारपीट झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली कणकवली फोंडा परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला आहे. जवळपास अर्धा तास मुसळधार पाऊस कोसळला या अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू पिकाला मोठा फटका बसला असल्याचे दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या –


