🕒 1 min read
नवी दिल्ली: पाच राज्यांच्या निवडणुकांची मतमोजणी सध्या सुरू आहे. यात आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये चांगलीच बाजी मारल्याचे दिसत आहे. कॉंग्रेसने केलेल्या नेतृत्व बदल तसेच शेतकऱ्यांचा भाजपबद्दल असलेला आक्रोश या सगळ्यांचा फायदा आम आदमी पक्षाला झाल्याचे दिसत आहे.
पंजाबमध्ये गेले काही महिने मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा, नंतर चरणजित सिंग चन्नी मुख्यमंत्री झाले आणि अमरिंदर सिंग यांनी वेगळा पक्ष काढत भाजपसोबत हातमिळवणी केली. या सगळ्याच परिणाम पंजाब येथील जनतेला ‘आप’ पक्ष एक चांगला पर्याय दिसला, असं म्हणायला काही हरकत नाही.
इस इंक़लाब के लिए पंजाब के लोगों को बहुत-बहुत बधाई। pic.twitter.com/BIJqv8OnGa
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) March 10, 2022
पंजाबमध्ये मिळालेल्या या यशावर आम आदमी पक्षाचे अध्यक्ष तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत म्हणलं आहे, “इस इंक़लाब के लिए पंजाब के लोगों को बहुत-बहुत बधाई”, असं ट्विट करत भगवंत मन यांच्यासोबतचा एक फोटो त्यांनी शेयर केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
‘प्रस्थापितांना नाकारुन पंजाबने देशासमोर…’; मनसे नेते अमेय खोपकर यांचं वक्तव्य
-
UP Results 2022 : “आपली लढाई आत्ता…”, प्रियंका गांधींचे मोठे वक्तव्य
-
जडेजाच्या अष्टपैलू खेळीने अश्विन झाला आनंदीत, पहा काय म्हणाला…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
