पुणे : ऑगस्ट अखेरीस राज्यात पावसाचे पुनरागमन झाले असले तरी पुण्यात तुरळक स्वरूपाचा पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले. जळगाव, चाळीसगाव, औरंगाबाद यासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली होती. आता पुढील ५ दिवसांमध्ये पुण्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच, ६ आणि ७ सप्टेंबर रोजी कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट दिला आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पुन्हा एकदा मान्सूनसाठी पोषक हवामान तयार झालं आहेत. यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली असून आजही राज्यात पावसाची स्थिती कायम आहे. आज राज्यातील तब्बल 15 जिल्ह्यांना हवामान खात्यानं यलो अलर्ट जारी केला आहे.
आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, बुलडाणा, वाशीम, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा आणि नागपूर अशा एकूण पंधरा जिल्ह्यांना आज हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केला आहे. वरील जिल्ह्यांत पुढील काही तासांत विजांच्या कडकडाटासह वेगवान वाऱ्याच्या साथीनं जोरदार पावसाची शक्यता आहे.
3 Sept, IMD ने आज दिलेल्या इशा-या प्रमाणे,राज्यात येत्या 5 दिवसांत काही ठिकाणी विजांच्या गडगडाटा सहीत पावसाची शक्यता, तर काही ठिकाणी मुसळधार. कोकणात ६,७ Sept ला काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पण.@RMC_Mumbai @RMC_Nagpur pic.twitter.com/ikksIA1dVw
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 3, 2021
दरम्यान पूर्व महाराष्ट्राकडून पश्चिम महाराष्ट्राकडे पाऊस सरकणार आहे. तर 6 आणि 7 सप्टेंबर रोजी कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. 6 सप्टेंबर रोजी रायगड आणि रत्नागिरी तर 7 सप्टेंबर रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यासोबतच, उद्यापासून पुढील ४ दिवस पुणे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून पुढील चारही दिवस हवामान खात्याने पुण्यात यलो अलर्ट जारी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘माझी आई सांगत होती, एकवेळ कुत्रा पाळ पण धोकेबाज आणि घाणेरडी माणसं पाळू नकोस’
- ‘काका संजय गांधींनी माझ्या वडिलांचे ऐकले असते तर ‘तो’ अपघात झाला नसता’, राहुल गांधींचा खुलासा
- शिवसेनेनं पाठीत खंजीर खुपसला म्हणणारे पाटील आता म्हणाले, ‘युतीचा विचारही होऊ शकतो’
- ‘…तर संजय राऊतांचा अमेरिकेचाही अभ्यास असू शकतो’; चंद्रकांतदादांचा राऊतांना चिमटा
- ‘कोरोनाची तिसरी लाट ओसरून जाईल पण…’ ; मोदी सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडेबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

