🕒 1 min read
पुणे : राज्यातल्या अनेक भागांत आज अचानक पावसाने हजरे लावली आहे. सकाळी 6 वाजल्यापासून मुंबईमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ पाहायला मिळत आहे. येत्या एक ते दोन दिवसांत ढगाळ वातावरण निवळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उत्तर महाराष्ट्रातही ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी गारपिटीची शक्यता कुलाबा वेधशाळेने व्यक्त केली आहे.
तर पालघर-रायगर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागात काही ठिकाणी रिमझिम तर काही भागात ढगाळ वातावरण आहे. पुढचे 48 तास राज्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
Generally cloudy weather conditions with possibility of light rain expected over parts of North Konkan and North Madhya Maharashtra during next 2 days. Thunderstorms with possibility of hail over parts Dhule, Nandurbar, Nasik, Jalgaon during next 2 days. pic.twitter.com/AAo7QzDbPl
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) December 11, 2020
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार 11 ते 15 डिसेंबर दरम्यान मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उपनगर, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग इथे रिमझिम पावसाच्या सरी पडतील तर ढगाळ वातावरण असणार आहे. धुळे आणि नंदुरबार इथे गुरुवार आणि शुक्रवार दोन दिवस पावसाचा जोर जास्त असेल तर 13 ते 15 डिसेंबर दरम्यान पुन्हा रिमझिम पाऊस आणि ढगाळ वातावरण राहिल.
जळगाव जिल्ह्यात आज पावसाची शक्यता तशी कमी असली तर पुढील 24 ते 48 तासात मुसळधार पडण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये गुरुवारी आणि शुक्रवारी मुसळधार पाऊस पडेल. अहमदनगर, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात देखील 11 ते 15 डिसेंबर दरम्यान रिमझिम पाऊस किंवा ढगाळ वातावरण राहिल असा अंदाज आहे.
महत्वाच्या बातम्या
- भावकीला जपा, गुलाल आपलाच… ग्रामपंचायत निवडणुका लागल्या !
- पश्चिम बंगालमध्ये लोकशाहीची सुरक्षा करण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू केली जावी : राम कदम
- दानवेंनी माफी मागावी म्हणून प्रहारचं टाकीवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन!
- प्रवाशांसाठी महत्वाची सूचना ! ‘या’ रेल्वे गाड्यांने प्रवास करण्यापूर्वी वेळापत्रक एकदा तपासून बघा
- मराठी तरुणांना रोजगाराची संधी, ठाकरे सरकारच्या ‘या’ नव्या योजनेतून ‘असे’ मिळवा अनुदान !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

