🕒 1 min read
मुंबई : पश्चिम बंगालमधील राजकारणाला हिंसक वळण मिळालं आहे. भाजपचा वाढता प्रभाव पाहून तृणमूलचे नेते आणि कार्यकर्ते घाबरले आहेत कि काय असा सवाल उपस्थित होत आहे. कारण आजपर्यंत भाजपचे कार्यकर्ते आणि आमदार-खासदारांवर हल्ले झाल्याचे पाहायला मिळत होते पण काल चक्क भाजपाध्यक्ष जे पी नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याची केंद्र सरकारने गंभीरपणे दखल घेतली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वत: या हल्ल्याचा निषेध नोंदवला असून पश्चिम बंगालच्या राज्यापालांना याबाबतचा रिपोर्ट पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, आपले लोकतंत्र अमूल्य असून पश्चिम बंगाल मध्ये शांतता राहावी अशी आपली इच्छा असून तिथे झालेल्या हिंसक घटनेची आपण निंदा करत असल्याचं पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. राज्यात पोलिस प्रशासन अपयशी ठरलं असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सूडाच्या भावनेने काम करत असल्याचं धनखड यावेळी म्हणाले. राज्यसरकारच्या कामात पारदर्शकतेचा अभाव असल्याचं सांगत राज्य सरकार आपल्याला कोणतीही माहिती देत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
एका बाजूला हे सर्व सुरु असताना इकडे मुंबईत आज याप्रकरणी भाजपा आमदार राम कदम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.कदम यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी केली आहे. “पश्चिम बंगालमध्ये लोकशाहीची सुरक्षा करण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू केली जावी यासाठी आम्ही राज्यपालांच्या भेटीला चाललो आहोत. आमची मागणी राष्ट्रपतींपर्यंत पोहोचवावी,” असं राम कदम यांनी ट्विट करत म्हटलं होतं.
हम निकले बंगाली citizens of india के लोगों के साथ काले झेंडे लेकर राजभवन राजपाल भगत सिंग कोश्यारीजी से मिलने. सभी बंगाली लोगों की मांग बंगाल में लोकतंत्र की रक्षा के लिए वहां पर राष्ट्रपति कानून लगाया जाए. यह हमारी बात वे राष्ट्रपतिजी तक पहुंचाये #MamataKillsDemocracy
— Ram Kadam (@ramkadam) December 11, 2020
दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी १९ डिसेंबर रोजी पुन्हा एकदा पश्चिम बंगालला भेट देण्याचा निर्णय घेतलाय. या दौऱ्यात ते दोन दिवस बंगालमध्ये राहणार आहेत. केवळ दीड महिन्याच्या कालावधीत अमित शहांचा हा दुसरा पश्चिम बंगाल दौरा ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- काय सांगताय? २४ तासांत होणार कोरोनाचा नाश!, प्रभावी औषध शोधण्यास शास्त्रज्ञांना यश
- राहुल गांधींविरोधात रचलं जातंय मोठं षडयंत्र? जाणून घ्या नेमका काय आहे प्रकरण …
- रावसाहेब दानवे यांची मंत्रिपदावरून तात्काळ हकालपट्टी करा; काँग्रेसचा हल्लाबोल
- …अन्यथा मुंबईत नाईट कर्फ्यू लागू करावा लागेल; आयुक्तांची मुंबईकरांना ताकीद
- शेतकरी संघटनांशी संवाद साधण्यासाठी केंद्र सरकारची दारे सदैव खुली आहेत – नरेंद्र सिंह तोमर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

