बुलढाणा : काल परवा पासून जिल्ह्यातिल सिंदखेडराजा तालुक्यात झालेल्या पावसामुळे खड़कपूर्णा कालव्यातिल पाण्याने असंख्य शेतकऱ्यांच्या शेतात पानी साचले आहे, त्यांमुळे शेताला तलावाचे स्वरूप आले असून शेतात पेरलेली पिके नष्ट झाली आहेत. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडलाय.
15 वर्षापासून खड़कपूर्णा प्रकल्पाचा उजवा कालवा ठिकठिकाणी फुटलेला असून तो पूर्णपणे बुजल्या गेलाय, कालव्यातील पाणी वाहून जाण्या ऐवजी कालव्यात साचलेले पाणी सरळ शेतकऱ्यांच्या शेतात साचत आहे, त्यामुळे शेकडो हेक्टर वरील शेतजमिनीतील पिकांचे नुकसान झाले आहे , याबाबत दरवर्षी शेतकरी खड़कपूर्णा उपविभागीय अधिकारी व जिल्ह्याधिकारी यांच्याकडे तक्रारी करीत आहेत, मात्र त्याकडे हेतुपरस्पर दुर्लक्ष केल्या जात असल्याच्या आरोप शेतकरी करीत आहेत.
नैसर्गिक व मानवी संकटामुळे जगाव की मराव असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिलाय.. ,उजव्या कालव्याचे काम तातडीने पूर्ण करुण कालवा मोकळा करावा जेणेकरून कालव्यात पानी साचनार नाही ते सरळ वाहून जाईल व शेतकऱ्यांच्या शेतजमिनी वाचतील तसेच शेतातील पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुण आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्ह्याधिकारी यांच्यकडे केली आहे, अन्यथा आम्हाला सामूहिक आत्महत्या केल्या शिवाय पर्याय उरलेला नाही अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- गर्दी टाळण्यासाठी पालिकेने लढवली शक्कल, औरंगाबादेत करवसुली केंद्रांमध्ये वाढ!
- ‘लग्नाला २३ वर्षे झाली’; पतीच्या आठवणीत मंदिरा बेदीची भावूक पोस्ट
- गोवंडी येथील उद्यानास टिपू सुलतानाचे नाव देण्यास भाजपचा विरोध
- …अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात पंढरपूर पॅटर्न राबविण्यासाठी वारकरी रस्त्यावर उतरेल – विश्व हिंदू परिषद
- ‘मुंबई विमानतळावर ‘आवाज’ हा मराठी माणसाचाच असेल’, मनसेचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

