मुंबई : राज्यातल्या बहुतेक भागांना 10 आणि 11 ऑक्टोबर रोजी परतीच्या पावसानं झोडपून काढलं आहे. खरिप हंगामातील पिकं काढणीला आली असतानाच पाऊस सुरू झाल्यानं पिकांचं नुकसान होत आहे. काही ठिकाणी कापूस गळून पडला आहे, तर काही ठिकाणी सोंगून ठेवलेली सोयाबीन भिजली आहे. अशातच हवामान विभागानं हा संपूर्ण आठवडा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं कमी दाबाचं क्षेत्र अधिक खोलवर गेल्यानं त्याची दिशा पश्चिम-वायव्य अशी राहिल, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे.
“11 ते 17 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात कोकणासह आतल्या भागात पाऊस पूर्णत: सक्रीय राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. ढगांच्या गडगडाटासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापणीला आलेल्या पीकांवरती दाट प्रभाव होण्याची शक्यता आहे,” असं ट्वीट मुंबईच्या हवामान विभागाचे उपसंचालक के. एस. होसाळीकर यांनी केलं आहे.
येणारा आठवडा,11-17 Oct, महाराष्ट्रात कोकणसह आतल्या भागात पाउस पूर्णता सक्रीय राहण्याची शक्यता.काही ठीकाणी मुसळधार ते अतीमुसळधारची शक्यता,गडगडाटासह ???? जोरदार वारे.कापणीला आलेल्या पीकांवरती दाट प्रभाव होण्याची शक्यता.
IMD च्या इशा-यांकडे कृपया लक्ष द्यावे.TC@RMC_Mumbai
@RMC_Nagpur pic.twitter.com/i4mcAuWNxV— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 11, 2020
महत्वाच्या बातम्या-
- मुंबई बत्ती गुल झाल्याने सर्वसामन्यांचे हाल; मुख्यमंत्र्यांनी दिले तातडीने चौकशीचे आदेश
- प्रत्येकाला लस मिळण्यासाठी कोरोनावरील एकाहून अधिक लशींचा वापर सरकार करणार
- “मेट्रो कार शेड कांजूरला नेण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा फसवी”
- ‘त्या’ जमिनीसाठी सरकारला 2000 कोटी डिपॉझिट करावे लागतील : सोमय्या
- ‘आता फक्त मोदींनी फेकलेल्या बिस्किटांवरच दिवस काढावे लागणार’


