बीड : बीडमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. मंगळवारी मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या साखरे कुटुंबियांवर काळाने घाला घातला. एकाच कुटुंबातील आईसह दोन चिमुकलींना झोपेत सर्पदंश झाला. या दुर्घटनेत दोन चिमुकलींचा मृत्यू झाला तर आईची प्रकृती गंभीर आहे. त्या महिलेवर उपचार सुरू आहेत. ही दुर्देवी घटना केज तालुक्यातील सोनेसांगवी येथे घडली.
केज तालुक्यातील सोनेसांगवी येथील दीपक साखरे हे त्यांच्या चार मुली व पत्नीसह त्यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये झोपले होते. या दरम्यान जयश्री साखरे (वय ३०), स्वप्नाली साखरे (वय ४), स्वीटी साखरे (वय ३) या तिघींना विषारी साप चावला. यानंतर साप दीपक यांच्या अंगावर गेला, परंतु साप अंगावर आल्यामुळे दीपक यांना जाग आली असता त्यांनी सापाला मारले. यानंतर त्यांच्या लक्षात आले की, स्वप्नाली व स्वीटीचा यांचा यात मृत्यू झाला आहे. तर जयश्री साखरे यांना सुद्धा साप चावला आहे.
यांनतर दीपक यांनी जयश्री यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. एकाच कुटुंबातील तिघांना सर्पदंश झाल्याने दोन चिमुकलींची जीव गेला आहे. या हृदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.