औरंगाबाद : गच्चीवर खेळत असताना अचानक खाली पडून दिड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना विजयनगर, गारखेडा परिसरात रविवारी घडली. श्रेया आकाश ढगे असे चिमुकलीचे नाव असून या घटनेची नोंद पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात घेण्यात आली आहे.
प्राप्त माहिती नुसार, श्रेया हि रविवारी संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास दुमजली इमारतीवर खेळत होती. घरात नुकताच मोठ्या बहिणीचा वाढदिवस झाला होता. खेळता खेळता तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. त्यानंतर ती बेशुद्ध झाली, हि माहिती तिच्या वडिलांना कळाली त्यांनी तिला सुरुवातीला उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, श्रेयाची तब्येत खालावली नंतर तिला घाटी दवाखान्यात वडील आकाश ढगे यांनी दाखल केले. मात्र, रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी तिचा घाटी दवाखान्यात मृत्यू झाला. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस पुढील तपास करीत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- संभाजीराजेंची गादी श्रेष्ठ, त्यांनी भाजपच्या खासदारीला लाथ मारायला हवी- हर्षवर्धन जाधव
- मनगढत कहाण्या बनविण्याचं काम सुरू, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला – नाना पटोले
- हे राजपुत्रांनी राजपुत्रांसाठी चालवलेलं सरकार, भाजप आमदाराचा आरोप
- ‘नाना पटोलेंची भूमिका सरकारला सुरुंग लावणारी’ ; अजितदादांचा आक्रमक पवित्रा
- ‘काँग्रेसने ज्या शिवसेनेला पाळलं, त्यांच्या प्रमुखांनीच पाळत ठेवली हे किती वाईट!’; भाजप नेत्याची बोचरी टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

