Share

अर्णबच्या पोलीस कोठडीवरील सुनावणी पुन्हा ढकलली पुढे!

Published On: 

अलिबाग : अन्वय नाईक प्रकरणी बुधवारी रायगड पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीला अटक केली. त्यानंतर अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या निषेधार्थ भाजपा कार्यकर्त्यांनी राज्यातही ठिकठिकाणी आंदोलन केले. महाराष्ट्रात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

रिपब्लिकचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह फिरोज शेख, नितेश सरडा या तिन्ही संशयित आरोपींची रवानगी अलिबागमधील नगरपालिकेच्या शाळेत करण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या तिघांना नगरपालिकेच्या शाळेत ठेवण्यात आले आहे. या तिन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. मात्र ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता अर्णव यांच्या पोलीस कोठडीच्या निर्णयाबाबत 9 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

या तिघांनाही अलिबागच्या मुख्य़ न्यायालयाने बुधवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या सुनावणीनंतर अलिबाग पोलिसांनी सत्र न्यायलयात त्याच्या पोलीस कोठडीसाठी अर्ज केला होता. या अर्जावर आज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी अर्णव यांच्या वकीलांनी ही सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केली होती.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!