Share

आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटर! जालना जिल्ह्यातील कोविड सेंटरमध्ये औषधांचा तुटवडा, रुग्णांचे हाल

Published On: 

🕒 1 min read

जालना: एकीकडे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे आणि दुसरीकडे प्रशासनाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर येत आहे. भोकरदन शहरात उभारलेल्या कोविड सेंटरकडे आरोग्य अधिकाऱ्यांचे दुर्लक्षामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची हेळसांड होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेकांना मनस्ताप सोसावा लागत असल्याने संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

भोकरदन शहरासह तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा भोकरदन शहराजवळील जोमाळा परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या शासकीय निवासी शाळेत दोन महिन्यांपूर्वी कोविड सेंटर चालू केले आहे. कोरोनाची दुसरी लाट अगोदरपेक्षाही भयानक असल्याचे चित्र सध्या दिसून येत असल्याने नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात तालुक्यात दिवसाला ३० ते ४० रोज नवीन रुग्ण आढळून येत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

अशात आरोग्य विभागाने सतर्क राहून काम करण्याची गरज आहे. केवळ तीन कर्मचाऱ्यांच्या भरवशावर हे कोविड सेंटर सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोग्य विभागाचे तीनही कर्मचारी शिप्ट संपल्यानंतर येथे उपचारासाठी आलेल्या रुग्णांना पाहण्यासाठी कोणीही राहत नाही. याशिवाय येथे औषधांचा देखील तुटवडा जाणवतो. अनेकदा नवीन रुग्णांना येथे कामावर असलेले चौकीदार, सफाई कामगार किंवा इतर कर्मचारी दाखल करून घेतात. किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांची वाट पाहत तासनतास बाहेरच बसून राहण्याची वेळ रुग्णांवर येते.

महत्त्वाच्या बातम्या     

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!