🕒 1 min read
औरंगाबाद : सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या सेवा- सुविधा जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासनाकडून साधनसामुग्री, वैद्यकीय उपकरण, औषधसाठा याचा वेळेत पुरवठा होत आहे. विविध योजनांचा लाभ रुग्णांना मिळावा यासाठी आरोग्य क्षेत्रातील काम करणाऱ्या प्रत्येकांनी रुग्णांना सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी चिकलठाणा जिल्हा रुग्णालय येथे आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत केले. थेट वार्डात जात त्यांनी रुग्णांशी संवाद साधला. तसेच या माध्यमातून आरोग्य सेवा सुविधांबाबत आढावा घेण्याचा प्रयत्न केला.
जिल्हा रुग्णालयात उपलब्ध असलेल्या डॉक्टरची संख्या, रुग्णांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधा, आवश्यक असणारी यंत्र सामुग्री याचा विभागनिहाय आढावा टोपे यांनी घेतला. यामध्ये रुग्णवाहिका, बदली वाहनचालक उपलब्धता, ब्लड बँक, क्ष-किरण व रेडिओलॉजी विभाग, सी-टी स्कॅन मशिन, लेप्रोस्कोपी उपकरण याबरोबरच स्वच्छता, वीज, सुरक्षा, विशेषज्ञ वैद्यकीय प्रशिक्षण, एमआरआय मशिन याबाबत आढावा घेऊन संबधित पदधिकाऱ्यांचा तात्काळ ह्या सुविधा अद्यावत करुन वाढ करण्याबाबत निर्देशित केले. त्याचबरोबर जिल्ह्यातील कोविड परिस्थिती व लसीकरणाबाबत देखील आढावा घेतला.
मंत्री टोपे यांनी जिल्हा रुग्णालयाच्या सेवासुविधा बाबत पहिल्या व दुसऱ्या मजल्या वरील विभागात प्रत्यक्ष पाहणी केली तसेच जनरल वार्डातील रुग्णांसोबत संवाद साधला जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधाविषयी प्रतिक्रिया जाणून घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सरकार टिकवायचं की नाही? किती काळ टिकवायचं? हे सगळं उद्धव ठाकरेंच्या हातात’
- भाजपने त्वरित आमदार सुनील कांबळे यांना निलंबित करावे; राष्ट्रवादीची आक्रमक भूमिका
- बँक विलीनीकरणाच्या प्रक्रियेवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन खुश, म्हणाल्या…‘
- उद्याचा भारत बंद सर्वसामान्यांचा हक्क मारणाऱ्या मोदी सरकार विरोधात-नाना पटोले
- …तर मोदीही सांगतील मी संजय राऊत यांच्या समोरच राहतो’; राऊतांची मिश्किल टिपण्णी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
