Share

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा भोकरदनमध्ये ‘जननायक’म्हणून गौरव

Published On: 

🕒 1 min read

जालना : राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा भोकरदनमध्ये जननाय म्हणून गौरव करण्यात आला आहे. टोपे यांनी कोरोना विषाणूच्या काळात महाराष्ट्रात प्रत्यक्ष भेट देऊन आरोग्यसेवा केली. राज्यातील जनता हे कधीच विसरणार नाही. असे म्हणत अँड. हर्षकुमार जाधव मित्रमंडळ भोकरदनतर्फे राजेश टोपे यांना सन्मानपत्र देऊन त्यांचा ‘जननायक’ असा गौरव करण्यात आला.

राज्याचे आरोग्यमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या समोर एका बाजूला आईचे आजारपण आणि दुसऱ्या बाजूला राज्यातील नागरिकांचे आरोग्य अशी दुहेरी परिस्थिती होती. मात्र, अशा परिस्थितीत देखील त्यांनी आरोग्यमंत्री म्हणून उल्लेखनिय कार्य केले. त्यांचे हे कार्य महाराष्ट्राची जनता कधीच विसरणार नाही, अशा भावणा यावेळी अँड.हर्षकुमार जाधव मित्रमंडळ परिवाराकडून व्यक्त करण्यात आला.

या वेळी कोरोना काळात काम केलेल्या आरोग्य सेवेतील कर्मचारी आणि पोलिसांसह कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. अँड.हर्षकुमार जाधव मित्र मंडळांचे नारायण जिवरग, विलास शिंदे, जयंतराव जोशी, फैसल चाऊस, रघुनाथ पांडे, अँड.सुहास देशमुख,राजु इंगळे यांची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!