🕒 1 min read
मुंबई : बीड जिल्ह्यातील परळीतील पूजा चव्हाण या तरूणीने पुण्यात जीवन संपवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही तरूणी पुण्यात शिकण्यासाठी आलेली होती. नुकतीच तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून तिनं आपली जीवनज्योत विझवली.
ही आत्महत्या आहे की तिला कोणी मारलं ? असा प्रश्न भाजपा महिला आघाडीने उपस्थित करून या प्रकरणाला वेगळंच वळण दिलं आहे. या २२ वर्षीय तरूणीचे ठाकरे सरकारमधील कथित मंत्र्यांसोबत प्रेमसंबंध होते, त्यातून तिने आत्महत्या केल्याचा आरोप भाजपाने केला आहे.
दरम्यान,पूजा चव्हाण यांचे कुटुंबीय दबावात असल्याची चर्चा सुरु असताना आता या प्रकरणात पोलीस दबावात असल्याचा संशय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेतले जात असून गुन्हा दाखल झाला पाहिजे. पण पोलीस तपासात प्रगती दिसत नाही. यामुळे पोलीस दबावात आहेत का, याप्रकरणी सत्य समोर आले पाहिजे, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले.
दरम्यान,एका बाजूला कुटुंबीयांवर तसेच पोलिसांवर देखील दबाव असल्याची चर्चा असताना आता पूजाच्या संशयास्पद मृत्यूबाबत आवाज बुलंद करणारे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर आणखी एक गंभीर आरोप लावला आहे.
पूजा चव्हाणच्या संशयास्पद आत्महत्येबाबत आवाज उठवल्यामुळे काल पासून धमक्यांचे फोन येतायत. ठाकरे सरकार आल्यापासून ही झुंडशाही बळावली आहे.
धमक्यांनी बधणारा मी नाही हे सरकार प्रायोजित गुंडांनी लक्षात घ्यावे. @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @OfficeofUT— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 15, 2021
भातखळकरांनी ट्विट करून म्हटलंय की, पूजा चव्हाणच्या संशयास्पद आत्महत्येबाबत आवाज उठवल्यामुळे रविवारपासून मला धमक्यांचे फोन येतायेत, ठाकरे सरकार आल्यापासून ही झुंडशाही बळावली आहे असा आरोप त्यांनी केला.तसेच धमक्यांनी बधणारा मी नाही, हे सरकार प्रायोजित गुंडांनी लक्षात घ्यावं असा इशारा भाजपा आमदार अतुल भातखळकरांनी दिलं आहे. दरम्यान, भातखळकर हे आमदार असूनही जर त्यांना धमक्या दिल्या जात असतील तर राज्यात कायद्याची भीती या गुंडांना उरली आहे कि नाही असा देखील सवाल उपस्थित होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- हिरकणीनंतर आता सोनाली कुलकर्णी झळकणार आणखी एका शौर्यगाथेत
- ‘सतत टीका करणे योग्य नाही’, चेन्नईच्या पिचला नावं ठेवणाऱ्यांना गावसकरांचं चोख उत्तर
- कोणी काहीही बोलू द्या, मी संयमाने जनतेची कामे करतो-आ.संदिप क्षीरसागर
- ग्रामपंचायतीच्या १५० उमेदवारांना नोटीसा; निवडणुक विभागाची कारवाई
- कोरोनाने पुन्हा काढलं डोकं वर, राज्यातील ‘या’ गावात 27 जणांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
