सांगली : देशात १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील सर्वांसाठी लसीकरण सुरु करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. अशातच अनेक ठिकाणी लसींचा तुटवडा निर्माण होत आहे. राज्यात १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचं सरसकट मोफत लसीकरण केलं जाणार आहे. तब्बल ५ कोटी ७१ लाख जनतेचं मोफत लसीकरण केलं जाणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मात्र, राज्याला मिळणारा लसींचा साठा तसेच ४५ वर्षांपुढील नागरिकांच्या दुसऱ्या डोसची जोडणी यामुळे १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्यास राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी असमर्थता दर्शवली आहे. यामुळे राज्यात १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण सुरु होणार नाही. यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राजेश टोपेंवर बोचरी टीका केली आहे.
‘काल सकाळी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी घोषित केलं की एक तारखेपासून आम्ही 18 ते 45 वयोगटातील लोकांचे आम्ही लसीकरण करणार आहोत. नंतर 4 वाजता सांगितलं की ते करता येणार नाही. म्हणजे हे लोक पुरते गोंधळलेले आहेत. सकाळी जी प्रेस घेतली होती, ती गांजा ओढून घेतली होती का ? यांना उठ सूट केंद्राकडे बोट दाखवायचं आहे. मुळात विचारसरणी एक नसताना, कोणताही अजेंडा नसताना ते एकत्र आले आहेत,’ असा घणाघात गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांनी शिल्लक सोयाबीन बियाणे इतरांना द्यावे, मंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन
- लष्करप्रमुख-पंतप्रधानांची भेट; लष्कराची रुग्णालये आता सामान्य नागरिकांसाठी खुली
- काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या प्रकृतीबाबत विश्वजीत कदमांची महत्वाची माहिती !
- राज्य सरकारचीच चौकशी करा; परमबीर सिंह यांची न्यायालयात याचिका
- लोक बाहेर फिरतायत, आता १५ दिवसांच्या पूर्ण लॉकडाऊनची गरज; हायकोर्टाच्या सूचना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

