Share

तिसऱ्या टप्यासाठी मानवत शहरामध्ये ७ लसीकरण केंद्रे सुरु करण्याची मागणी

Published On: 

परभणी :  जिल्ह्यातील मानवत शहरामध्ये १ मे पासून सुरु होणाऱ्या लसीकरणाच्या तिसऱ्या टप्यासाठी एकाच ठिकाणी गर्दी होवू नये,  या साठी मानवत शहरामध्ये  सात ठिकाणी लसीकरण केंद्र उभारण्याची मागणी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस प्रेरणा वरपुडकर यांनी नुकतीच तहसिलदार डी. डी. फुपाटे यांच्याकडे करण्यात आली आहे.

मानवत शहरातील ग्रामीण रुग्णालयात लसीकरण मोहिम सुरु आहे. त्यामुळे वरपुडकर यांनी बुधवारी सकाळी ११ वाजता लसीकरण केंद्राला भेट दिली. या वेळी लसीकरणासाठी एकाच केंद्रावर होणारी गर्दी कमी करण्यासाठी शहरामधील अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे उभारल्यास लसीकरणाची गती वाढून गर्दी देखील कमी करण्यासाठी मदत होणार आहे. त्याचमुळे तालुका प्रशासनाकडून १ मे पासून सुरु होणाऱ्या लसीकरणाच्या माेहिमेसाठी सात प्रभागांमध्ये लसीकरण केंद्रांची ऊभारणी करावी अशी मागणी या वेळी करण्यात आली आहे.

या मागणीमध्ये वरपुडकर यांनी कोराेना रुग्णांची वाढती संख्या तसेच कमी पडणारे बेड, ऑक्सिजन, इन्जेशनचा देखील विचार करावा. तसेच या वेळी ऑक्सिजनची कमतरता तर खुप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कोरोना वाढू नये, या साठी लसीकरणाचे प्रमाण वाढवणे गरजेचे आहे. त्यामुळे लसीकरणाचा दर देखील खुप मोठ्या प्रमाणात वाढवणे गरजेचे असल्याचे या वेळी वरपुडकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या     

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!