Share

देशी-विदेशी मद्यासह ‘तो’ करत होता अवैध गुटखा विक्री, पोलीस येताच ठोकली धूम

Published On: 

वैजापूर: वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथे  देशी विदेशी मद्यासह गुटखा विक्री सुरू असलेल्या किराणा दुकानावर पोलीसांनी छापा टाकल्याची कारवाई (दि.२६) रोजी दुपारच्या सुमारास केली. मात्र कारवाई दरम्यान दुकानदाराने घटनास्थळाहुन पळ काढला. यावेळी दुकानातून पोलीसांनी मोठ्या प्रमाणावर मद्यासह गुटख्याचा साठा जप्त केला. याप्रकरणी किराणा दुकानदार ज्ञानेश्वर रख्माजी आवारे, रा. धोंदलगाव याच्याविरुद्ध पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, धोंदलगाव येथील ज्ञानेश्वर आवारे हा त्याचे माऊली किराणा या दुकानात विनापरवाना देशी-विदेशी मद्यासह राज्यशासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची विक्री करित असल्याची माहिती शुक्रवारी दुपारच्या सुमारास पोलीसांना मिळाली. लगेचच पोलीसांनी माहितीतील ठिकाणी छापा मारला मात्र पोलीस आल्याचे समजताच ज्ञानेश्वर याने त्याठिकाणाहुन धूम ठोकली.

यावेळी किराणा दुकानात १५ हजार  रुपये किंमतीचे देशी-विदेशी मद्य व २४ हजार ३३० रुपये  किंमतीचा हिरा, विमल, राजनिवास आदी कंपनीचा पानमसाला व गुटखा पोलीसांना मिळून आला. दुकानदार ज्ञानेश्वर आवारे याच्याविरुद्ध पोलीसात कलम २७२,२७३,१८८, ३२८, ३४ भादवीसह अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ व नियमन २०११ चे शिक्षा पात्र कलम ५९ व कलम ६५ ई म.दा.का. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!