मुंबई : मार्वल स्टुडीओच्या चित्रपटाचा चाहतावर्ग भारतात खुप मोठ्य़ा प्रमाणावर आहे. गेल्या काही वर्षात मार्वलच्या चित्रपटानी भारतातील तिकीट खिडकीवर तुफान गल्ला जमवण्यात यशस्वी झाले आहे. मार्वलच्या अवेंजर्स या चित्रपटांच्या मालिकांनी भारतात हॉलिवूड चित्रपटांच्या कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.
आता मार्वलच्या भारतीय चाहत्यासाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. बॉलीवूडमधील अभिनेता दिग्दर्शक फरहान अख्तर हा मार्वल स्टुडीओच्या चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे. मार्वलच्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तो काही दिवसापुर्वीच बँकाँकला रवाना झाला आहे. मात्र फरहान अख्तरने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. मात्र जर हे वृत्त खरे असतील तर भारतीय चाहत्यांसाठी खुप मोठी पर्वणी ठरु शकते.
मार्वल स्टुडीओ हा मार्वल सिनेमॅटीक युनिवर्सचा एक भाग आहे. ब्लॅक पँथर नंतर एखादा सुपरहिरो भारतातील असावा अशी भारतीय चाहत्यांची इच्छा होती. त्यावेळी मार्वलने काही संकेत देण्याचे टाळलो होते. मात्र फरहान अख्तर चित्रकरण करत असलेल्या चित्रपटाची बातमी समोर आली त्यावेळी अनेक चाहत्यांनी आनंद व्यक्त केला. यापूर्वी त्यांनी अव्हेंजर्स, स्पायडरमॅन, डॉक्टर स्ट्रेंज असे अनेक चित्रपट प्रदर्शित केले आहेत. या चित्रपटांना जगभरातून तुफान प्रसिद्ध मिळालेला आहे. फरहान अख्तरचा आगामी चित्रपट ‘तुफान’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. यानंतर त्याच्या हातात कोणताही चित्रपट नाहीये.
महत्वाच्या बातम्या
- अवैध वाळू उपसा; पोलिसांच्या कारवाईत ४० ब्रास वाळू जप्त
- बाप रे!! निधीच्या ‘कोको’ला शोधून दिल्यास १ लाख रुपये मिळणार
- आमीर खानने ‘रंगीला’ चित्रपटानंतर राम गोपाल वर्मा यांच्यासोबत ‘या’ कारणांमुळे केले नव्हते काम
- ‘जो कहता था गंगा ने बुलाया है, उसने माँ गंगा को रुलाया है…’
- ‘वाह रे मोदी तेरा खेल, सोने के दाम में बिकता तेल’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

