जालना: जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत तसेच त्यातून बरे होणाऱ्यांची संख्या देखील आता वाढली असली तरी देखील कोरोनाचे सावट अजून पूर्णपणे संपलेले नाहीये. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाची स्थिती पाहता लॉकडाऊन १ जूनपर्यंत वाढवण्याचा येथील प्रशासनाने निर्णय घेतला आहे. तसेच यापूर्वीच्या आदेशान्वये दिलेल्या मार्गदर्शक सूचनांसह आणखी काही अतिरिक्त निर्बंध लागू करण्यात आले आहेत. जिल्हा दंडाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी शुक्रवारी हे आदेश काढले.
राज्यात कोरोनाची स्थिती अजूनही चिंताजनक असल्याने १५ मे पर्यंत असलेले लॉकडाऊन आता १ जून पर्यंत करण्यात आले आहे. तसेच कोणत्याही वाहनाने महाराष्ट्र राज्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींनी निगेटिव्ह आरटीपीसीआर चाचणी अहवाल बाळगणे आवश्यक आहे. हा अहवाल राज्यातील प्रवेशाच्या ४८ तासांपूर्वीचा असावा. संवेदनशील ठिकाणाहून येणाऱ्या व्यक्ती मग त्या देशातील कोणत्याही प्रदेशातील असो त्यांना यापूर्वीच्या १८ एप्रिल व १ मे मधील आदेशातील सर्व प्रतिबंध लागू राहतील.
कार्गो वाहतुकीत एक चालक व सफाईगार अशा दोनच व्यक्तींनाच परवानगी असेल. जर कार्गो वाहतूक ही राज्याबाहेरील असेल तर त्या वाहनातील कर्मचारी यांनी निगेटिव्ह आरटीपीसीआर चाचणी अहवाल बाळगणे आवश्यक आहे. या कालावधीत दूध संकलन, वाहतूक, प्रक्रिया निर्बंधाशिवाय चालू राहील, परंतु अत्यावश्यक वस्तूंचे व्यवहार किंवा घरपोच वितरणाद्वारे दुकानावर लावलेल्या निर्बधाच्या अधीन राहून किरकोळ विक्रीस परवानगी राहील.
महत्वाच्या बातम्या
- काय सांगताय! फरहान अख्तर अन तेही मार्वल स्टुडीओजच्या चित्रपटात
- गुड न्यूज : ‘या’ तारखेला होणार भारतात मॉन्सूनचे आगमन
- चक्रीवादळ धडकणार ! मुंबई महापालिकेची यंत्रणा सज्ज, रत्नागिरी-सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट
- अवैध वाळू उपसा; पोलिसांच्या कारवाईत ४० ब्रास वाळू जप्त
- बाप रे!! निधीच्या ‘कोको’ला शोधून दिल्यास १ लाख रुपये मिळणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

