Share

‘त्याने धैर्य कायम राखत खेळाडूंना प्रेरित केले’ ; पंतच्या नेतृत्वाचे धवन कडून कौतुक

Published On: 

मुंबई : श्रेयश अय्यरला दुखापत झाल्यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघाचा कॅप्टन रिषभ रिषभ पंतला करण्यात आले. रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटलने चेन्नई वर मात करत सामना एकतर्फी जिंकला. प्रथम फलंदाजीसाठी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर नाणेफेक गमावल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने 20 षटकांत 7 गडी गमावल्यानंतर 188 धावांची सन्माननीय धावसंख्या उभारली.

प्रतिउत्तरात शिखर धवन आणि पृथ्वी शॉच्या मदतीने दिल्ली कॅपिटलने आयपीएलच्या 14 व्या सत्रातील पहिल्या सामन्यात चेन्नईचा 7 गडी राखून चेन्नईचा पराभव केला.धवन आणि पृथ्वीच्या फलंदाजीमुळे दिल्लीने हे लक्ष्य सहज 18.4 षटकांत गाठले. धवनने 85 धावा केल्या आणि पृथ्वीने 72 धावांची तुफानी खेळी केली. रिषभच्या नेतृत्वाची शानदार सुरुवात पाहायला मिळली.

शिखर धवन देखील पंतच्या नेतृत्व क्षमतेमुळे प्रभावित झाला आहे. धवन रिषभच्या नेतृत्वबद्दल म्हणला, ‘पंतने शानदार कामगिरी केली. सर्वप्रथम आनंदाची बाब म्हणजे त्याने नाणेफेक जिंकली. या खेळपट्टीनंतर नंतर फलंदाजी करणे चांगले असते. त्याने धैर्य कायम राखत खेळाडूंना प्रेरित केले. त्याने चांगले बदल केले. कर्णधार म्हणून त्याची ही पहिली लढत होती. त्यामुळे अनुभवासह तो अधिक परिपक्व होईल, असा मला विश्वास आहे.’ धवन पुढे म्हणाला, ‘ऋषभबाबत सर्वोत्तम बाब म्हणजे तो धैर्य कायम राखतो. तो हुशार आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!