🕒 1 min read
चेन्नई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) कालच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (केकेआर) सनरायझर्स हैदराबादला 10 धावांनी पराभूत करत मालिका जिंकली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीनंतर कोलकाता नाईट रायडर्सने (केकेआर) 20 षटकांत 6 षटकांत 187 धावा केल्या. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबाद 20 षटकांत 5 गडी बाद 177 धावा करू शकली.
20 षटकांच्या खेळानंतर हैदराबादने 5 गडी गमावून 177 धावा केल्या. मनीष पांडे 61 धावा आणि अब्दुल समद 19 धावा देऊन नाबाद राहिले. तथापि, तो संघाला सामना जिंकण्यात अपयशी ठरला आणि केकेआरने 10 धावांनी सामना जिंकला.
हैदराबादची सुरवात खराब झाली. दोन्ही सलामीचे फलंदाज जास्त रान घेता परतले. पुढे हा डाव नीष पांडे आणि जॉनी बेयरस्टोनं सावरला. जॉनी बेयरस्टोनं 40 चेंडूत 55 धावा केल्या. मनीष पांडेने 44 चेंडूत 61 धावा केल्या. शेवटच्या षटकात संघाला विजयासाठी 22 धावांची गरज होती. परंतु हैदराबादला फक्त 11 धावा करता आल्या आणि कोलकाताने हा सामना 10 धावांनी जिंकला.
महत्वाच्या बातम्या :
- ब्रेक दि चेनचा पहिला बळी! उस्मानाबादेत सलून व्यवसायिकाने मृत्युला कवटाळले
- कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ग्रामीण भागात लसीकरणाचे प्रमाण वाढवा – संजय बनसोडे
- खासदार छत्रपती संभाजी म्हणतात, नियम पाळणाऱ्या व्यापाऱ्यांना सूट तर मोडणाऱ्यांवर कारवाई करा
- ‘नियम पाळणं हेच सर्वात मोठं कोरोना विरोधातील हत्यार’
- भाजप आ.सुरेश धस यांच्या मागणीची महाविकास आघाडीकडून दखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
