चेन्नई : भारतात सध्या आयपीएलचा ‘रण’संग्राम सुरु आहे. आज राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज या दोन संघांमध्ये झुंज पाहायला मिळणार आहे. यावेळी हे दोन्ही संघ विजयाच्या हेतूने मैदानात उतरतील. स्टीवन स्मिथऐवजी संजू सॅमसनकडे राजस्थान रॉयल्सचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. त्यामुळे आता त्याच्या नेतृत्वाकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे. राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व लोकेश राहुल करणार आहे.
राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यामध्ये आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत 21 लढती पार पडल्या आहेत. राजस्थान रॉयल्सने 12 लढतींमध्ये विजय मिळवून आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. पंजाब किंग्जला 9 लढतींमध्येच विजय संपादन करता आला आहे. त्यामुळे उद्या होणाऱया लढतीआधी राजस्थान रॉयल्सचे पारडे जड असणार आहे.
मात्र, यावेळी पंजाब किंग्स देखील जोरदार तयारीत दिसत आहे. आयपीएल सुरु होण्यापूर्वीच पंजाब किंग्सने जिंकण्याची तयारी दर्शवली होती. आज होणाऱ्या सामन्यात हे दोन्ही संघ विजयच्या हेतूने मैदानात उतणार आहेत. कोणता संघ बाजी मारणार हे पाहण्याजोगे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- ब्रेक दि चेनचा पहिला बळी! उस्मानाबादेत सलून व्यवसायिकाने मृत्युला कवटाळले
- कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ग्रामीण भागात लसीकरणाचे प्रमाण वाढवा – संजय बनसोडे
- खासदार छत्रपती संभाजी म्हणतात, नियम पाळणाऱ्या व्यापाऱ्यांना सूट तर मोडणाऱ्यांवर कारवाई करा
- ‘नियम पाळणं हेच सर्वात मोठं कोरोना विरोधातील हत्यार’
- पांडेवर भारी नितीशचा डाव ; कोलकाताने हैदराबादला 10 धावांनी केले पराभूत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
