चेन्नई : आयपीएलच्या रविवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सकडून सनरायझर्स हैदराबादच्या संघाचा १० धावांनी पराभव झाला. या सामन्यात १८८ धावांचे लक्ष्य गाठताना सनरायझर्स हैदराबादचा संघ १७७ धावांपर्यंत मजल मारु शकला. मात्र या पराभवामागे सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने केलेल्या काही चुका कारणीभूत ठरल्या.
सामन्याच्या दुसऱ्या डावात धावांचा पाठलाग करताना उतरलेल्या हैदराबाद संघाची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार डेव्हीड वॉर्नरला पहिल्याच षटकांत एका धावेवर जिवदान मिळाले होते. मात्र कर्णधार डेव्हिड वॉर्नरला या जिवदानाचा फायदा उचलता आला नाही. आणि कोलकात्याचा गोलंदाज प्रसिध कृष्णनने वॉर्नरला बाद करत हैदराबादच्या फंलदाजीतील हवाच काढून घेतली. डेव्हिड वॉर्नरला फक्त तीन धावांवर समाधान मानावे लागले. तर गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार आणि संदीप शर्मा दोघेही अपयशी ठरले.
तर दुसरा सलामीवीर वृध्दीमान साहाने षटकार मारत चांगली सुरुवात केली मात्र तोही लवकर बाद झाला. यामुळे हैदराबादचे दोन्ही सलामीवीर फक्त १० धावा करुन माघारी परतले. मधल्या फळीतील जॉनी बेअरस्टो आणि मनीष पांडे यांनी हैदराबादकडून अर्धशतक झळकावत विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र दोघे बाद होताच हैदराबादच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनावर मात केलेल्या राणाचे नाणे खणखणीत वाजले; 80 धावांची खेळी करुन उचलला विजयात मोलाचा वाटा
- आजचा सामना राजस्थानविरुद्ध पंजाब
- पांडेवर भारी नितीशचा डाव ; कोलकाताने हैदराबादला 10 धावांनी केले पराभूत
- जखमी लेखाधिकाऱ्याला 77 लाख 9 टक्के व्याजासह भरपाई देण्याचे आदेश
- शेत तळ्यात उडी मारुन विवाहीत उदृयोजकाची आत्महत्या, आत्महत्येस प्रवृत्त करणारी तरुणी गजाआड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
