चेन्नई : मागील आयपीएलचा सत्र पृथ्वी शॉसाठी खराब होता. त्याने 13 सामन्यात 17.53 च्या सरासरीने 228 धावा केल्या. युएईमध्ये खेळल्या गेलेल्या 13 व्या सत्रात पृथ्वीला दोन अर्धशतकं करता आली. आयपीएलमधील खराब कामगिरीनंतर पृथ्वी कसोटी क्रिकेटमध्येही फ्लॉप ठरला. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये तो स्वस्तात बाद झाला होता. त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले.
मात्र, नंतर पृथ्वीने विजय हजारे ट्रॉफीमध्ये एक अविस्मरणीय कामगिरी केली. त्याने 165.40 च्या उत्कृष्ट सरासरीने 827 धावा केल्या ज्यामध्ये चार शतकांचा समावेश होता. पृथ्वीने विजय हजारेच्या एका हंगामात सर्वाधिक धावा केल्याचा मयंक अग्रवालचा विक्रम मोडला.या आयपीएलमध्ये 14 व्या सत्राची सुरूवात पृथ्वी शॉने धमाकेदार केली आहे. पृथ्वीने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध 72 धावा (38 चेंडूत 9 चौकार, 3 षटकार) चा शानदार डाव खेळला.
चेन्नई विरुद्धच्या डावानंतर पृथ्वीने त्याच्या यशाचे श्रेय अमरेंना दिल आहे. तो म्हणाला, ऑस्ट्रेलिया दौऱयावरील अपयशानंतर मला ‘टीम इंडिया’तून बाहेर काढण्यात आले. मायदेशात परतल्यानंतर मी प्रवीण अमरे सरांकडे गेलो. त्यांच्याकडून फलंदाजी तंत्रातील त्रुटीबाबत मार्गदर्शन घेतले. देशांतर्गत क्रिकेट खेळलो. विजय हजारे क्रिकेट स्पर्धेत मला त्याचा फायदा झाला. आयपीएलमधील सलामीच्याच लढतीत चांगली फलंदाजी करता आली असल्यामुळे आनंदी आहे. आता माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला आहे, अशी प्रतिक्रिया पृथ्वी शॉने दिली.
महत्वाच्या बातम्या :
- ब्रेक दि चेनचा पहिला बळी! उस्मानाबादेत सलून व्यवसायिकाने मृत्युला कवटाळले
- कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ग्रामीण भागात लसीकरणाचे प्रमाण वाढवा – संजय बनसोडे
- कोरोनावर मात केलेल्या राणाचे नाणे खणखणीत वाजले; 80 धावांची खेळी करुन उचलला विजयात मोलाचा वाटा
- आजचा सामना राजस्थानविरुद्ध पंजाब
- पांडेवर भारी नितीशचा डाव ; कोलकाताने हैदराबादला 10 धावांनी केले पराभूत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

