🕒 1 min read
औरंगाबाद : देशात एकीकडे १०० कोटी लसीकरण झाल्याचा जल्लोष साजरा होत आहे. तर दुसरीकडे अजूनही बहुतांश जिल्हे लसीकरणात मागे असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यात औरंगाबादचाही समावेश असल्याने प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. लस नाही तर प्रवेश नाही या नियमाची महानगरपालिकेत अत्यंत काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ज्यांचे लसीकरण झालेले आहे अशांनाच पेट्रोल देण्यात येणार आहे. एक महत्त्वपूर्ण निर्णय प्रशासकांद्वारे घेण्यात आला आहे.
यात प्रामुख्याने सर्व प्रथम औरंगाबाद महानगरपालिकेच्या आस्थपनेवरील सर्व अधिकारी-कर्मचारी यांच्या कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण झाल्याची खातरजमा संबंधित आस्था प्रमुख यांनी करावी. लसीकरण पूर्ण झाल्याचे अंतिम प्रमाणपत्र सर्व संबधिताकडून प्राप्त करून घ्यावे. ३० नोव्हेंबर पर्यंत दोन मात्रा पूर्ण झाल्याची खातरजमा करावी. ज्यांनी पाहिला डोस घेतलेला आहे. तथापि ज्यांचा दुसरा डोस ३० नोव्हेंबर नंतरचा आहे केवळ त्यांनाच या नियमातून वगळण्यात येईल. हा आदेश महानगरपालिकेत कार्यालयीन किंवा इतर कामकाजा करिता तसेच विविध मागण्यांबाबत कार्यालयात येणाऱ्या सर्वांसाठी लागू राहील.
स्मार्ट सिटी कार्यालयाला सुद्धा लागू राहील. औरंगाबाद महानगरपालिका आस्थापनेशिवाय शहरातील शासकीय व खाजगी कार्यलाय, जलतरण तलाव, योगा संस्था, इन डोअर स्पोर्टस, सिनेमा हॉल, नाट्यगृह, मल्टिप्लेक्स, कृषिउत्पन बाजार समिती, हॉटेल व्यवसायिक, मंगल कार्यालय, सर्व प्रकारचे दुकाने, खाजगी रुग्णालये, औद्योगिक आस्थपना, महाविद्यालय व सर्व माध्यमांच्या शाळा मधील शिक्षक यांचे दोन्ही डोस पूर्ण झाल्याची खातरजमा करून प्रवेश द्यावा. शहरातील पेट्रोल पंप चालकांनी स्वतः लसीकरण करून घ्यावे. तसेच संबंधित कर्मचारी यांनी दोन्ही डोस पूर्ण केल्याची खातरजमा करावी तसेच पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या लसीकरण पूर्ण झाल्याची खातरजमा केल्यानंतरच इंधन देण्यात यावे असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ’40 नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार, 1 जानेवारीला महाराष्ट्र घोटाळामुक्त करणारच’
- पंतप्रधानांची दिवाळी जवानांसोबत, सर्जिकल स्ट्राईकच्या आठवणींना दिला उजाळा
- पारंपरिक वेशभूषेत मानसीने केली पतीसोबत अनोखी दिवाळी साजरी
- ‘केंद्र सरकारचं मन मोठं नाही तर सडकं, कुचकं आहे’, संजय राऊतांचा घणाघात
- ‘100 रुपये वाढवायचे आणि 5 रुपये कमी करायचे, हे कसलं मोठं मन??’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
