Share

“महाराष्ट्राचं खाऊन महाराष्ट्राबद्दल द्वेष सरळ दिसून येतोय”, निलेश राणेंचा जितेंद्र आव्हाडांना टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यातील मविआ नेत्यांवर होत असलेल्या ईडी कारवाईची राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी चांगलाच धसका घेतल्याचे दिसते. त्यांनी म्हटले आहे की, “उद्या ‘ईडी’ने माझ्या मुलीला चौकशीला बोलावले तर ती आत्महत्या करेल तसेच महाविकास आघाडी घ्यायचा तो निर्णय घेईल पण मला विचाराल तर आता मी माझ्या मुलीला महाराष्ट्रात ठेवणार नाही.” यावरूनच भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ट्वीट करत जोरदार प्रहार केला आहे.

“हे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातले कॅबिनेट मिनिस्टर बोलत आहेत. महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राचं खाऊन महाराष्ट्राबद्दल द्वेष सरळ दिसून येतोय. ही दाऊद गॅंग बोलत आहे, तुम्ही स्वतः चालते व्हा, पाकिस्तानमध्ये तुमची गरज जास्त आहे.”, असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे.

दरम्यान राज्य सरकारकडून भाजप नेत्यांची चौकशी सुरु असली तरी कोणालाही तुरुंगात टाकले आहे का? चौकशी करणे आणि धाडी टाकणे यामध्ये फरक आहे. पण आता केंद्रीय यंत्रणा थेट घरात घुसल्या आहेत. यावर महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते चर्चा करतील. पण मी माझ्या मुलीला महाराष्ट्रात ठेवणार नाही, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!