Share

ईडीचा ताफा मातोश्रीपर्यंत; उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्याला ईडीचा झटका 

Published On: 

🕒 1 min read

 मुंबई: राज्यातील मविआ नेते आणि त्यांच्या कुटुंबियांना ईडीकडून टार्गेट केले जात असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अगोदर पासूनच म्हटले आहे. मात्र आता ईडीचा ताफा थेट मातोश्रीपर्यंत पोहोचला आहे. ईडीने पुष्पक ग्रुपच्या (ED action taken against Pushpak Group) ६ कोटी ४५ लाख रुपयांच्या मालमत्तेची चौकशी केली आहे. त्यात रश्मी ठाकरे यांचे सख्खे भाऊ तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर  (Sridhar Patankar) यांच्या ठाण्यातील नीलंबरी प्रकल्पातील ११ सदनिकांना टाळे ठोकण्यात आले आहे.

दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी १५ फेब्रुवारी रोजी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत म्हटले हते की, “महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी तपास यंत्रणांच्या धाडी सुरुच राहतील. एवढ्यावरच हे प्रकरण थांबणार नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ठाकरे कुटुंब आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर देखील ईडीच्या धाडी पडतील”, आता संजय राऊत यांनी केलेले भाकीत सत्यात उतरले असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान यावर मातोश्रीवरून अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

मात्र संजय राऊत पाठोपाठ आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्याला ईडीने झटका दिला आहे. त्यामुळे यावर मविआ सरकार काय भूमिका घेते यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. तर भाजपकडून शिवसेनेला निशाण्यावर धरले जात आहे. भाजप नेते नितेश राणे यांनी तर थेट मनोहर जोशी यांच्या राजीनाम्यचा हवाला देत मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!