Share

टी-२० विश्वकरंडकाच्या उपांत्य सामन्यात झेल सोडल्याचे अजूनही दुःख, हसन अली

Published On: 

२०२१ च्या टी-२० विश्वकरंडकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज हसन अली याने सामन्याच्या अत्यंत महत्वाच्या क्षणी ऑस्ट्रेलीयाच्या  मॅथ्यू वेडचा झेल सोडला. यामुळे हसन अलीला सामन्यानंतर जगभरातून क्रिकेट रसिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव करून पुढे पहिलावहिला टी-२० विश्वकरंडक जिंकला.ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० विश्वचषक २०२१च्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने रोमहर्षकरित्या पाकिस्तानचा पराभव केला.या  सामन्यात महत्त्वाच्या क्षणी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीने क्षेत्ररक्षणात चूक केली.  त्याने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मॅथ्यू वेडचा झेल सोडला, वेडनेच ऑस्ट्रेलियाला अंतिम सामन्यात पोहोचवले. सामन्यानंतर हसन अलीली चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. सोशल मीडियावरही हसन अलीला ट्रोल करण्यात आले होते .

यावर प्रतिक्रिया देताना आपल्या क्रिकेटच्या आयुष्यातील मॅथ्यू वेडाचा झेल सोडणे हा सर्वात कठीण प्रसंग असल्याचे हसन अली याने नुकतेच सांगितले. १७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघाला शेवटच्या काही षटकांमध्ये चांगली कामगिरी करता आली  नव्हती. हसनने शाहीन आफ्रिदीच्या चेंडूवर वेडचा सोपा झेल सोडला. त्यानंतर वेडने शाहीनच्या सलग तीन चेंडूंवर तीन षटकार ठोकून पाकिस्तानला विश्वचषकातून बाहेर ढकलले.

वेडच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले होते आणि अंतिम सामन्यात  ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा पराभव करून आपला पहिला वहिला  टी-२० विश्वकरंडक उंचावला. या मॅथ्यू वेडचा झेल सोडल्याच्या प्रसंगाबद्दल हसन अली  म्हणाला कि , ”माझ्या कारकिर्दीतील हा आतापर्यंतचा सर्वात कठीण क्षण होता आणि या गोष्टी लवकर विसरणे खूप कठीण आहे. व्यावसायिक खेळाडू असल्याने तुम्हाला पुढे जावे लागते. खरे सांगायचे, तर हे मी आजपर्यंत कोणाला सांगितले नाही, पण त्या सामन्यानंतर मी दोन दिवस झोपलो नाही. माझी पत्नी माझ्यासोबत होती आणि मला झोप येत नसल्याने ती पण  तणावाखाली दिसत होती.”

”मी शांत होतो आणि एका बाजूला बसलो होतो, कारण मी सोडलेला झेल माझ्या मनात येत राहिला. बांगलादेशल दौऱ्यापूर्वी मी स्वत: ला तयार केले होते. बांगलादेशमध्ये मी तीन दिवसांत ५०० झेल घेतले आणि नो-बॉलच्या समस्येवरही काम केले”, असेही  हसन अलीने या वेळी सांगितले.

      महत्वाच्या बातम्या :  

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!