Share

हरसिमरत कौर-बादल यांचा राजीनामा केवळ शेतकरी आणि सरकार यांच्यातला ‘ कम्युनिकेशन गॅप ‘ भरून काढण्यासाठी ?

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या स्नुषा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी नरेंद्र मोदी सरकार आणत असलेली तीन्ही विधेयकं शेतकरी विरोधक असल्याचा आरोप करत काल राजीनामा दिला होता.

यावर शिरोमणी अकाली दलाचे प्रवक्ते नरेश गुजराल यांनी “महाराष्ट्र देशा”सोबत बोलतांना सांगितले की, ” शेती संबंधित प्रास्ताविक विधेयक हे चांगले असतील – नसतील तो मुद्दा जरा बाजूला ठेऊया. मुळ मुद्दा हा आहे की त्यांनी विधेयक आणतोय हे सांगितल्या बरोबर तिकडे पंजाब आणि हरियाणात मोठ्या प्रमाणावर शेतकरी आणि आडते रस्त्यावर उतरले. हाच पॅटर्न काहीसा उत्तर प्रदेशात सुद्धा दिसतोय याचा अर्थ सरकारने जे तीन बीलं आणली आहेत. त्याच्यात जे ‘ स्टेक होल्डर ‘ आहेत त्यांच्या सोबत ते बोलले नाहीत हे सरळ दिसतंय. कदाचित म्हणून शेतकर्यांचा संताप देखील उफाळून येतोय या सगळ्याला वाचा फोडण्यासाठी,राहिलेला ‘कम्युनिकेशन गॅप’ भरून काढण्यासाठी आमच्या नेत्या हरसिमरत कौर यांनी राजीनामा दिला. यामागे दुसरा कुठलाही हेतू नाही” असे त्यांनी सांगितले.

हरसिमरत यांनी ट्विट वरून आपल्या राजीनाम्याची माहिती दिली होती. “मी शेतकरी विरोधी विधेयक आणि कायद्यांचा विरोध करत केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे. शेतकऱ्याची मुलगी आणि बहिण म्हणून त्यांच्यासोबत उभी राहिल्याचा मला अभिमान आहे.”

जर सरकारने आज शेतकरी विरोधी विधयेक मांडली तर अकाली दलाच्या केंद्रीय मंत्री आपला राजीनामा देतील, असे सुखबीर बादल लोकसभेत बोलले होते. कदाचित त्याचाच हा पुढचा भाग आहे असे देखील बोलले जातय. सरकारच्या नव्याने येणाऱ्या ३ कायद्यांचा पंजाबमधील २० लाख शेतकऱ्यांवर प्रभाव पडणार आहे. २८ हजार आडते, कृषी बाजारातील ३ लाख मजूर आणि २३ लाख शेतीतील मजूरांवर याचा दुष्परिणाम होणार आहे” अशी देखील माहिती ‘ द इंडियन एक्सप्रेस ‘ या वृत्तपत्राने दिली आहे.

दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हरसिमरत कौर यांचा राजीनामा मंजूर केला आहे. तसेच या खात्याचा अतिरिक्त कार्यभार कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे सोपवला आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!