🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलने पुन्हा भाजपावर टीकेची तोफ डागली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाला बहुमताला आवश्यक असणारी संख्या गाठण्यात अपयश आले आहे. पण सध्या तिथे घोडेबाजाराची मोठी चर्चा सुरू आहे. काँग्रेस आणि जेडीएसने सत्ता स्थापनेसाठी दावा केला असली तरी भाजपाने त्यांच्या भूमिकेवर टीका केली आहे.
हाच धागा पकडून हार्दिकने भाजपावर हल्लाबोल केला आहे. अप्रामणिकपणा आणि पैशांच्या जोरावर भाजपाने सरकार बनवले तर ती देशभक्ती ठरते. तर काँग्रेस आणि जेडीएसने सरकार स्थापन केले तर ती लोकशाहीची हत्या असते. कमाल आहे, तुम्ही केली तर लीला आणि दुसऱ्याने केली तर चोरी, असे उपहासात्मक ट्विट हार्दिकने केले आहे.
https://twitter.com/HardikPatel_/status/996572615962656768
https://twitter.com/HardikPatel_/status/996416469662617600
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
