Share

शेतकऱ्यांसाठी सर्वात चांगलं बजेट, घरं, रेल्वे, १ लाख कोटी महाराष्ट्राला-खा. नवनित राणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) देशाचा अर्थसंकल्प (Budget) संसदेत सादर केला आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा तिसरा अर्थसंकल्प आहे. त्यात त्यांनी भारतीय रिर्जव्ह बँक डिजीटल करन्सीसह ४०० वंदे भारत ट्रेन, ६० लाख नव्या नोकऱ्या अशा मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यामुळे पंतप्रधान गती शक्ती योजनेतून पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात येतील. येणाऱ्या काळात रेल्वे, रस्ते, हवाई, जल वाहतुकीसाठी मोठी गुंतवणूक केली जाणार आहे. असेही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले. यावर आमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आमरावतीच्या खासदार नवनीत राणा प्रसारमाध्यमांशी प्रतिक्रिया देताना म्हणाल्या, विरोधक जे बोलत आहेत त्यावर जास्त लक्ष देण्याची गरज नाही. २ लाख ३१ हजार कोटी शेतकऱ्यांसाठी देण्यात आला आहे. मला वाटतं शेकऱ्यांसाठी हा सर्वात चांगला बजेट आहे. आवास योजनेच्या माध्यमातून ज्या महिलांना आतापर्यंत घरे नाहीत त्यांच्यासाठी ४८ हजार कोटी रुपये दिले आहेत. तसेच वंदे मातरमच्या ४०० रेल्वे सुरु करण्यात आली आहे. १ लाख करोड महाराष्ट्राला दिलेल आहे. लोकं म्हणत होते की उत्तर प्रदेशात निवडणुका आल्यामुळे युपीला चांगले बजेट मिळले पण सर्व राज्यांना समान बजेट मिळाले आहे, हा एक राज्याचा बजेट नसून पूर्ण देशाला डोळ्यांसमोर ठेऊन हा बजेट सादर केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!