नवी दिल्ली : भारतीय संघात दीर्घकाळ खेळल्यानंतर हरभजन सिंगने (Harbhajan Singh) अखेर क्रिकेटला अलविदा केले आहे. हरभजन सिंगने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक पोस्ट टाकून याबाबत माहिती दिली आहे. भज्जीने त्याच्या यूट्यूब चॅनलवर निवृत्तीची घोषणाही केली आहे. 23 वर्षांचा प्रवास संपला, आता खेळाला गुडबाय केल्याचे हरभजन म्हणाला.
त्याच्या यूट्यूब चॅनलवर थेट येत हरभजन सिंग म्हणाला की, ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हरभजनने ऑस्ट्रेलियाविरुद्धची हॅट्ट्रिक संस्मरणीय असल्याचे सांगितले. यानंतर त्याने 2007 मध्ये जिंकलेला T20 विश्वचषक आणि 2011 मध्ये जिंकलेला विश्वचषक संस्मरणीय मानला. अंडर-14 ते आयपीएलपर्यंत खेळलेल्या सर्व खेळाडूंचे त्याने आभार मानले. याशिवाय भज्जीने पंच, ग्राउंड्समन आणि चाहत्यांचेही आभार मानले. भज्जीने बीसीसीआय अध्यक्ष आणि सचिवांचेही आभार मानले.
आता मी तुमच्यासोबत जास्त वेळ घालवू शकेन, असे हरभजन सिंगने पत्नी आणि मुलीला सांगितले. आगामी काळात कोणत्याही भूमिकेत असो, मी क्रिकेटच्या माध्यमातून भारताची सेवा करण्याचा प्रयत्न करेन, असेही हरभजन सिंग म्हणाला आहे.
विशेष म्हणजे, हरभजन सिंग भारतीय संघाकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भज्जीने भारतीय संघासाठी 103 सामन्यात 417 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 236 सामन्यात 269 विकेट घेतल्या आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हरभजन सिंगने 28 सामन्यांमध्ये 25 विकेट घेतल्या आहेत. ही आकडेवारी पाहता तो कोणत्या स्तराचा खेळाडू होता हे सांगता येईल. भज्जीने कसोटी क्रिकेटमध्ये 2 शतकी खेळीही खेळली आहे. आयपीएलमध्ये भज्जीने मुंबई इंडियन्स, केकेआर, चेन्नई सुपर किंग्ज इत्यादी संघांचे प्रतिनिधित्व केले. आता तो नव्या भूमिकेत कधी दिसणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- “सत्ता गेल्यानं आलेला हताशपणा विरोधकांच्या चेहऱ्यावर दिसत आहे”
- “राज्यासमोरील भीषण समस्यांवर उत्तरे शोधण्यात या सरकारला जराही रस नाही”
- जडेजावरही चढला ‘पुष्पा’ चित्रपटाचा फिव्हर, पहा भन्नाट व्हिडीओ
- तुकाराम सुपेच्या कार्यालयात आणखी सापडलं ३३ लाखांचं घबाड
- महाराष्ट्र एकीकरण समितीची ‘सिल्व्हर ओक’वर धाव; राज्यातील खासदारांना पवार करणार एकत्र


