Share

तुकाराम सुपेच्या कार्यालयात आणखी सापडलं ३३ लाखांचं घबाड

Published On: 

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा निलंबित आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe) याच्या कार्यालयात पुणे पोलिसांना आणखी ३३ लाखांच घबाड सापडलं आहे. काल तुकाराम सुपेच्या घरावर टाकलेल्या धाडीत ८८ लाख ४९ हजार ९८० रोख व सोने असा एकूण ९० लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता. तसेच तुकाराम सुपेचा जावाई व मुलीच्या घरात १ कोटी ५८ लाख जप्त करण्यात आले होते. त्यामुळे या प्रकरणाचा गुंता आणखी वाढला असून सुपेकडे मोठी रक्कम सापडण्याची शक्यता आहे.

या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांनी दिली आहे. टीईटी परीक्षा गैरव्यवहार (TET Exam Scam) प्रकरणी पुणे पोलिसांनी तुकाराम सुपेच्या नातेवाईकांकडून काल रात्री २५ लाख रुपये जप्त केले होते. पुणे पोलिसांना २४ तासात तुकाराम सुपेकडून ५८ लाख रुपये जप्त करण्यात यश आलं आहे. यापूर्वी १ कोटी ५८ लाखांहून अधिक रक्कम सुपेकडून आणि त्याच्या नातेवाईकांकडून जप्त करण्यात आली होती.

पुणे पोलिसांनी तुकाराम सुपेला अटक केल्यानंतर त्याच्या घरी पहिला छापा टाकला होता. त्यावेळी सुपेच्या घरातून ८८ लाख ४९ हजार ९८० रोख, पाच ग्रॅम सोन्याचे नाणे, ५ लाख ५० हजार रुपयांची एफडी केल्याची कागदपत्रे जप्त केली आहेत. याशिवाय सुपेने त्याच्या मित्राला लाखो रुपये दिल्याचेही माहिती मिळाली आहे, असे पुणे पोलिसांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!