🕒 1 min read
मुंबई : जगभरातील अनेक क्रिकेटपटू क्रिकेटमधील कारकिर्द संपल्यानंतर क्रिकेटपेक्षा वेगळ्या क्षेत्रात पाऊल ठेवतात. अनेकांनी क्रिकेट कारकिर्दीनंतर राजकारण, अभिनय, व्यावसाय अशा वेगवेगळ्या क्षेत्रात स्वत:ला आजमावून पाहिले आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार धोनी याने देखील क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर शेती व्यवसायाकडे वळला आता यात भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगचाही समावेश आहे. तो भारतीय संघातून मागील अनेक वर्षापासून दूर आहे, या दरम्यान तो अनेकदा टेलिव्हिजनवर झळकला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६०० हून अधिक विकेट्स घेतलेला हरभजन सिंग ‘फ्रेंडशिप’ या तमिळ चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत पदार्पण करत आहे. हा चित्रपट तेलुगू आणि हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर १ मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे.
या टीझरमधून हरभजनची विविध रुपं चाहत्यांना पाहायला मिळाली आहे. तो या टीझरमध्ये डान्स करताना दिसला आहे. तसेच दाक्षिणात्य पद्धतीची लुंगी नेसतानाही दिसत आहे. याबरोबरच तो मारामारी करतानाही दिसत आहे. तसेच मारामारी केल्यानंतर त्याला पोलिसांनी तुरुंगात टाकल्याचेही दिसले आहे. एवढेच नाही तर तो टीझरच्या शेवटी क्रिकेट खेळतानाही दिसला आहे.
Sharp,Crisp,Intense #FriendShipMovieTeaser of my Movie is Here.Enjoy it,Guys!
Tamil –https://t.co/LSUImD7xUG
Telugu-https://t.co/unECTwvJK5
Hindi-https://t.co/BSzIWz05iG@JPRJOHN1 @akarjunofficial @shamsuryastepup #Losliya @actorsathish @JSKfilmcorp @ImSaravanan_P
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) March 1, 2021
पॉल राज आणि सुर्याने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात हरभजन बरोबर अर्जुन आणि तमिळ बिग बॉस फेम लोसिया मारियोनेसन देखील झळकणार आहेत. या चित्रपटाच्या टीझरला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असून हरभजनने या चित्रपटाच्या टीझरची लिंक ट्विट केली आहे. त्याच्याबरोबरच भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने देखील या चित्रपटाचे आणि हरभजनचे कौतुक करत टीझरची लिंक ट्विट केली आहे. तसेच त्याने या चित्रपटासाठी शुभच्छाही दिल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठवाड्यात ६४७ नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद; ८ बाधितांचा मृत्यू
- हिंगोलीत जिल्ह्यात ७ मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर; बाहेरगावहून आलेले ४ प्रवासी पॉझिटिव्ह
- ठिय्या आंदोलनाचा ४२ वा दिवस; ७ मार्च रोजी होणाऱ्या आक्रोश मोर्चाची जय्यत तयारी
- अर्ध्यावरती डाव मोडला.. कारच्या धडकेत पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर
- मोबाइल टॉवरच्या आमिषाने शेतकऱ्याची फसवणूक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
