मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात घडत असणाऱ्या घटनांमुळे राज्यात महिला सुरक्षित आहेत की नाहीत असा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे. शिवरायांच्या महाराष्ट्रात महिला असुरक्षित असल्याचे सांगत विरोधक राज्य सरकारवर टीका करत आहेत तर सत्ताधारी इतर राज्यातील घटनांचा दाखला देत आपली जबाबदारी झटकत असल्याचे दिसून येत आहे.
डोंबिवलीत एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 33 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना अलीकडेच उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 23 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. सोशल मीडियावर देखील अनेकांनी तीव्र निषेध व्यक्त करत, नरधमांना फाशी देण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी आता मनसेनं देखील आक्रमक भूमिका घेतील असून नरधामांना फाशीची शिक्षा द्या अथवा त्यांचं गुप्तांग कापा, अशी मागणी मनसेने केली आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून अशी मागणी करणारा पोस्टर लावण्यात आला आहे.
मनसेचे महेश कदम यांनी चंदनवाडी याठिकाणी बॅनर लावून 33 राक्षसांना फाशी देण्याची मागणी केली आहे. संबंधित बॅनरमध्ये 33 नराधमाचा प्रतिकात्मक फोटो म्हणून 33 तोंडी राक्षसाचा फोटो लावण्यात आला आहे. तसेच ‘डोंबिवली येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या 33 राक्षसांना फाशी द्या, नाहीतर त्याचं गुप्तांग कापा’ अशी मागणी संबंधित बॅनरमधून करण्यात आली आहे. याप्रकरणी मनसे आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कंपनीने असमर्थता दर्शविल्यामुळे परीक्षा रद्द करण्याची नामुष्की ओढावली – टोपे
- बहुजन समाजातील मुलांनी यांच्या सतरंज्याच उचल्याव्यात ही मानसिकता या सरकारची आहे – पडळकर
- ‘खुद तो डूबे हैं सनम, तुमको भी ले डूबेंगे’; सनरायझर्स हैदराबाद समोर टिकणार का पंजाब किंग्स?
- भारतीय हवाई दलाची ताकत वाढणार, 56 विमानांच्या खरेदी करण्याकरिता स्पेनच्या कंपनीसोबत करार
- काँग्रेसला देशात पुन्हा एकदा सोनियाचे दिवस येतील – बाळासाहेब थोरात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

