मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ टीव्हीवरील ही खूप प्रसिद्ध विनोदी मालिका आहे. या मालिकेचे चाहते जगभरात आहेत. या मालिकेमधील पात्रांना लोक भरभरून प्रेम देतात. अनेक वर्षे या मालिकेत नट्टू काका यांची भूमिका घनश्याम नायक यांनी साकारली होती. त्यांचे कर्करोगामुळे निधन झाले. यावेळी मालिकेतील निर्मात्यांनी सांगितले होते की, नट्टू काका यांची जागा कोणताही दुसरा कलाकार घेणार नाहीय. दरम्यान, आता नट्टू काका ही भूमिका अभिनेता किरण भट्ट करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
‘तारक मेहता.. ’च्या अधिकृत यूट्यूब पेजवरून शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये निर्माते असित कुमार मोदी म्हणाले की, “घनश्याम नायकची जागा कोणीही घेऊ शकत नाही याबद्दल बोलतात, परंतु ‘शो मस्ट गो ऑन’ या म्हणीप्रमाणे आम्ही नवीन कलाकार किरण भट्ट याला ही भूमिका दिली आहे. मला आशा आहे की प्रेक्षकवर्ग किरण यांना देखील तितकेच प्रेम देईल.”
दरम्यान, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील अनेक कलाकारांनी याआधीच शो सोडला आहे. गुरचरण सिंग, मोनिका भदौरिया, नेहा मेहता या सर्व कलाकारांनी मालिका आधीच सोडली आहे. सगळ्यात पहिल्यांदा टप्पुची भूमिका भव्य गांधीनी साकारली होती. त्याने देखील हा शो सोडला आहे.
महत्वाच्या बातम्या :


