Share

Political Crisis : एकनाथ शिंदेंवर उद्धव ठाकरेंची मोठी कारवाई! शिवसेना नेतेपदावरुन हकालपट्टी

Published On: 

मुंबई : राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेची सूत्र हाती घेतली आहेत. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राने राज्यात मोठा सत्तासंघर्ष पाहिला. शिवसेनेतील अंतर्गत बंडखोरीमुळे राज्यातील राजकीय चित्र पूर्णपणे पालटलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या ३९ आमदारांनी पाठिंबा दिला. हे सर्व ३९ आमदार आणि अपक्ष ११ आमदार सोबत घेऊन शिंदे महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडले.

यानंतर ठाकरे सरकार कोसळले. भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. यानंतर आता एक मोठी माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेविरोधातील बंडखोरी भोवली असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना नेतेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.

शिवसेनेकडून असं एक पत्र जरी करण्यात आलं आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पत्रावरती उद्धव ठाकरे यांची स्वाक्षरी देखील करण्यात आली आहे. तुम्ही पक्षविरोधी कारवाया करत आहात. तसेच स्वेच्छेने शिवसेनेचे सदस्यत्वही सोडले आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून माझ्याकडे असलेल्या अधिकारांचा वापर करून मी तुम्हाला पक्ष संघटनेतील ‘शिवसेना नेते’ पदावरून दूर करत आहे, असे पत्र काढून ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर कारवाई केली आहे.

दरम्यान, या संदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना दीपक केसरकर म्हणाले कि, ज्या प्रकारची नोटीस एकनाथ शिंदे यांना सेनेकडून पाठवली त्या संदर्भात आम्ही सेनेला रीतसर पत्र पाठवू. जर त्यांनी कारवाई मागे घेतली नाही तर आम्ही न्यायालयात जाऊन कारवाईचा प्रयत्न करू. असा इशारा त्यांनी दिला आहे. नेते पदावरून शिंदे यांना हटवला जातय हे लोकशाहीला शोभा देत नाही. सेनेच्या पक्षात असताना तुम्ही अफिडेबिट करून घेताय ? त्यांना दुसऱ्या पक्षात जायचा अधिकार असतो. असं देखील केसरकर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!