🕒 1 min read
मुंबई : सध्या भारतीय सिनेसृष्टीत सध्या बायोपिकपटांचे वारे वाहात आहेत. यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांवर चित्रपट बनवले जात आहेत. यामध्ये क्रीडा विश्वातील धोनी, मिल्खासिंग, तसेच येत्या काळात ‘पृथ्वीराज’, ‘मैदान’, ’83’, ‘सरदार उधम सिंग’ असे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या यादीत आता आणखी एका नव्या चित्रपट येणार असल्याची चर्चा सुरु आहे. हा चित्रपट भारतीय टीमचे सर्वात यशस्वी कर्णधार सौरव गांगुली यांची बायोपिक असल्याचे म्हंटले जात आहे.
हा चित्रपट Viacom यांच्या बॅनर खाली बनवण्यात येणार आहे. परंतु या चित्रपटात सौरव गांगुली यांची भूमिका कोण साकारणार या विषयी कोणती माहिती मिळालेली नाही. मात्र, रणबीर कपूर त्यांची भूमिका साकारणार असल्याची चर्चा होता आहे. यापूर्वी एका मुलाखतीत हृतिक रोशन हा दादांचा आवडता अभिनेता असल्याचे सांगितले होते. त्यामुळे हि भूमिका हृतिक साकारेल असे म्हंटले जात होते. त्यानंतर आता रणवीर कपूरच नाव समोर येत आहे.

याविषयी सौरव यांनी सांगितले होते की, हृतिकला जर भूमिका साकारायची असेल तर त्याला माझ्यासारखी बॉडी बनवावी लागेल. ‘अनेक लोक बोलतात की तुम्ही हृतिक सारखी बॉडी बनवा. पण माझा विश्वास आहे की माझी बायोपिक करण्यासाठी हृतिकला माझ्यासारखी बॉडी बनवावी लागेल,’ असे सौरव गांगुली म्हणाले होते.
संजय दत्तचा बायोपिक असलेल्या ‘संजू’ या सिनेमामध्ये देखील रणबीर कपूरने संजय दत्तची भूमिका साकारली होती. या सिनेमात संजय दत्तची विविध रूपे दाखवण्यात आलेली होती. या चित्रपटामध्ये त्याने उत्तम अभिनय केला होता. त्याच्या अभिनयाचे अनेकांनि कौतुक देखील केले होते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
